Monday, November 3, 2025
Homeऔरंगाबादसंस्थेच्या वतीने शेतकऱ्यांची माती परीक्षण खत व्यवस्थापन ई - प्रत्याकक्षिका चा फायदा,...

संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांची माती परीक्षण खत व्यवस्थापन ई – प्रत्याकक्षिका चा फायदा, 11

संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांची माती परीक्षण खत व्यवस्थापन ई – प्रत्याकक्षिका चा फायदा,
11

शेतकऱ्यांना प्रशिक्षण वर्ग,शेती पुरक माहिती‌ मुळे मोठा फायदा

खुलताबाद/प्रतिनिधी खुलताबाद तालु क्यातील शेतकऱ्यांच्या शेती संदर्भात संस्था कडुन माती परीक्षण, आरोग्य पत्रीका,खत व्यवस्थापन,ई -पिक प्रत्याकक्षिका,खत व्यवस्थापन व शेती विषयक पुरक माहिती‌ मुळे मोठा फायदा होत आहे.व शेतकरी ही मोठ्या उत्साहात याचा लाभ घेत असल्याचे चित्र आहे.सेहगल  फाउंडेशन व मोजक इंडिया प्राइवेट लिमिटेड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानने खुलताबाद तालुक्यात मध्ये कृषि ज्योति प्रकल्प अंतर्गत   २०२४ या साली १० गावातून ताजनापुर कानकशिळ,वडोद, माटरगाव,कानडगाव, खांडीपिंपळगाव, बोरवाडी,वडगाव, सोबललगाव,सावखेडा १०० शेतकरी यांचे जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करण्यात आली आहे.तसेच या वर्षी २०२५ खरीप हंगाम मध्ये १० गावातून झरी,दरेगाव, रेल, धामणगाव,लामनगाव, विरमगाव, शेकपुरवडी, अब्दुलपुर,तिसगाव तांडा,बोडखा आद्दी  गावातून ३०० शेतकरी यांची माती परीक्षण करण्यासाठी नमुने गोळा करण्यात आले आहे.माती परीक्षण करण्याचे फायदे हे संस्थेचे प्रकल्प प्रमुख,  योगेश शिनगारे यांनी समजावून सांगितले. माती परीक्षण अहवाला नुसार खत व्यवस्थापन बाबत संस्थेचे प्रतिनिधी.लहू ठोंबरे, शिवाजी काळे, अमोल सावदेकर यांनी प्रत्येक गावात बैठक घेऊन सांगण्यात आले.
सेहगल फाउंडेशन मागील वर्षी पासून खुलताबाद तालुक्यातील २० गावात काम करत आहे. त्यात कापुस, मका , गहु, अद्रक ई पीक प्रत्याक्षिका घेऊन प्रत्येक गावात शेती शाळा मधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. खरीप हंगाम मध्ये १० गावातून झरी,दरेगाव, रेल,धामणगाव, लामनगाव,विरमगाव, शेकपुरवाडी, अब्दुलपुरा,तिसगाव तांडा,बोडखा या गावात
माती परीक्षण करण्यासाठी नमुने गोळा करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments