शिल्लेगाव ते गवळी शिवरा मुख्यमंत्री सडक योजना अंतर्गत  रस्त्याचे भूमिपूजन होऊन तब्बल नऊ महिने उलटले तरी अद्यापही काम नाही
 आत्ताच एक्सप्रेस 
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव ते गवळीशिवरा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून   या रस्त्याचे भूमिपूजन होऊन तब्बल ९, महिने झाले परंतु या मुख्य रस्ता रामा क्र ३९, ला जोडले गेले असुन रस्त्यावर अजून एक टोपले खडी देखील पडली नाही,हा रस्ता गवळी शिवरा ह्या मार्गाने भाविक या रोडने महारुद्र मारोतीच्या दर्शनाला  गवळीशिवरा येथे ये जा करता अनेक छोटे मोठे अपघात या रस्त्यावर झाले असून शेतकऱ्यांचे माल नेताना देखील अनेकदा त्रास सहन करावा लागत आहे दरम्यान  आमदार प्रशांत बंब यांनी याकडे लक्ष दिले नाही मुख्यमंत्री सडक योजना अधिकारी यांनी अनेक वेळा सांगून देखील काम चालू झालेले नाही आमदार प्रशांत बंब आणि मुख्यमंत्री सडक योजना यांच्या ऑफिसला आठवण म्हणून एक स्मरण पत्र देणार असल्याचाही मनसे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पाटील नरोडे यांनी सांगितले आहे,या रस्त्याचे काम येत्या ८ दिवसात चालू झाले नाही तर  म न से स्टाईलने आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारू असे बोलतांना मनसे जिल्हा उपाध्यक्ष
तुषार पाटील नरोडे यांनी सांगितले.