योजनेच्या विहिरी शेततळे घरकुल कामांना वेग, पाऊस काम सुधरू द्या ना
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यात सद्या योजनेच्या विहिरी शेततळे घरकुल कामांनी वेग घेतला असुण त्यात पाऊस कामे सुधरु देत नसल्याचे चित्र आहे.
प्रशासनाने रखडलेल्या योजनेतील कामांना तातडीने करुन घेण्याचा किंवा काम परत करण्याच्या सूचना केल्याने लाभार्थी सद्या विहिरी शेततळे व घरकुल मंजूर कामे तातडीने तथा वेगात फटाफट करुण घेण्याचे ठरवल्याचे कामे जोरात वेगात सुरू आहे.
त्यात प्रथमता ऐन उन्हाळ्यात काम करण्या वेळी मे महिन्या दरम्यान बेमोसमी पावसाने लावून धरले त्यामुळे कामे लांबली रखडली व आता तातडीने काम करुन घ्याचे असताना मोसमी पावसाने लावून धरले आहे.त्यामुळे काम पुढे पुढे जात असुण प्रशासनाने मात्र कडक भुमिका घेतल्याने लाभार्थी घाईत आहे.

