Thursday, October 30, 2025
Homeऔरंगाबादअन्यायकारक वक्फ दुरूस्ती विधेयक विरूध्द शनिवार रोजी आयोजित आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने सामिल...

अन्यायकारक वक्फ दुरूस्ती विधेयक विरूध्द शनिवार रोजी आयोजित आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने सामिल व्हा ः शेख महेमूद

अन्यायकारक वक्फ दुरूस्ती विधेयक विरूध्द शनिवार रोजी आयोजित
आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने सामिल व्हा ः शेख महेमूद

जालना/प्रतिनिधी/ केंद्र सरकारने मुस्लीमाविरूध्द वक्फ दुरूस्ती विधेयक मंजुर करून मुस्लीमांविरूध्द मोठा अन्याय केलेला आहे. या निर्णयाविरूध्द ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड आणि देशातील अन्य मान्यवर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे अन्यायकारक विधेयक केंद्र शासनाने ताबडतोब मागे घ्यावे या मागणीसाठी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने शनिवार दि. 28 जून 2025 रोजी इदगाह मैदान जुना जालना येथे आंदोलन करण्यात येऊन जाहिर निषेध सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जालना जिल्ह्यातील जनतेने हजारोंच्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी केले आहे.
या जाहिर निषेध सभेमध्ये ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ चे प्रमुख पदाधिकारी मौलाना फरजुल रहिम मुझबी, मौलाना उमरेन महसुज रहेमानी, मौलाना सय्यद सदतुल्ला हुसेनी आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. शनिवार रोजी आयोजित जाहिर निषेध सभा सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजता शांततेत संपन्न होणार आहे.
केंद्र शासनाने या अगोदर देखिल शेतकऱ्यांविरूध्द अन्याय कारक विधेयक आणले होते. परंतू जनतेच्या रेटयामुळे शासनाला नतमस्तक व्हावे लागले. वक्फ बिल दुरूस्ती विधेयका विरोधात संपुर्ण देशामध्ये आंदोलने होत आहेत. शनिवार रोजी आयोजित आंदोलनामध्ये जालना जिल्हयातील जनतेने हजारोंच्या संख्येने सामिल होऊन शासनाला हे विधेयक मागे घेण्यासाठी भाग पाडावे असे आवाहन जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी केले आहे.
जालना जिल्हा मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड चे संयोजक मौलाना अब्दुल रऊफ आणि सर्व पदाधिकारी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्नशील असून आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments