Saturday, October 25, 2025
Homeऔरंगाबादसूर्यज्योत व सावली फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतील वारकऱ्यांना फराळ...

सूर्यज्योत व सावली फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतील वारकऱ्यांना फराळ वाटप

सूर्यज्योत व सावली फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतील वारकऱ्यांना फराळ वाटप

वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंग सेवा – जगन जाधव
देगलूर/प्रतिनिधी/ आषाढी एकादशीनिमित्ताने अखंड महाराष्ट्राचे दैवत पंढरपूर येथील विठ्ठल रुख्मीणीचे दर्शन आणि पायी दिंडी ही महाराष्ट्रातील जनतेसाठी धार्मिक पर्वणीच असते. त्अनुषंगाने पंढरपुर येथे आषाढी एकादशीला लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होतात. दिंडी मार्गावर महाराष्ट्रातील असंख्य दानशुर व्यक्ती विविध प्रकारचे दान करीत असतात. अन्नदान, महाप्रसाद, फराळाचे वाटप, आरोग्य सेवा असे विविध उपक्रम राबविले जातात.
याच पार्श्‍वभूमीवर दि २३ जून २०२५ रोजी आषाढी एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वरांची पालखी सोहळा पंढरपुराकडे प्रस्थान करीत असताना सासवड व जेजुरीच्या मध्ये माऊली माऊली,राम कृष्ण हरी नामघोष करीत सूर्यज्योत फाउंडेशन व सावली फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने हजारो वारकरी बंधू भगिनींना पोषक फराळाचे व फळाचे तसेच पाणी बॉटल चे वितरण करण्यात आले.
यावेळी वारकरी संप्रदायाची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा असून हा उपक्रम दरवर्षी राबवणार असल्याचे प्रतिपादन सूर्यज्योत फाउंडेशनचे प्रसिद्धी प्रमुख.जगन जाधव यांनी केले हा आदर्शवत उपक्रम राबविण्यासाठी गोरख कसबे, नागनाथ शाहू,कार्तिक पारधे, मिलिंद बनसोडे,अतुल गाळे, गणेश शाहू,बाबू यादव,राजू गालफाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments