Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादगुंडेवाडी शिवारात जुगार अड्डावर पोलिसांचा छापा

गुंडेवाडी शिवारात जुगार अड्डावर पोलिसांचा छापा

गुंडेवाडी शिवारात जुगार अड्डावर पोलिसांचा छापा
11 आरोपीकडून 34 लाख 08 हजार 524 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त 
जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..
जालना/प्रतिनीधी/ 21 रविवार रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना खब-या मार्फत गुंडेवाडी शिवारातील मधुकर निकाळजे याचे शेतामध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सायंकाळी तांदुळवाडी खुर्द शिवार गट नं. 27 मधील मधुकर मोहनराव निकाळजे यांचे शेतामध्ये चालु असलेल्या जुगार अड्डयावर अचानक छापा मारला असल्याची माहीती आज दि.22 रविवार रोजी दुपारी दोन वा. च्या सुमारास प्रसिध्दीपत्रकाद्वारे मिळाली आहे. त्याठिकाणी नारायण भगवान काळे वय 38 वर्ष रा. पोकळवडगाव ता. जालना, संतोष शंकर काळे वय 35 वर्ष रा. संजयनगर देऊळगाव राजा जि. बुलडाणा, बाळु संपतराव वाघमारे वय 27 वर्ष रा. पीर पिंपळगाव ता. जि. जालना, शेख ईस्माईल शेख इसा वय 40 वर्ष रा. पीर पिंपळगाव ता. जि. जालना, बबन माधवराव म्हस्के वय 55 वर्ष रा. माळशेंद्रा ता.जि. जालना, राजन छगन वाघमारे वय 48 वर्ष रा. खडकपुरा देऊळगाव राजा, गोरख गुलाब आढे वय 40 वर्ष रा. मोहाडी तांडा ता.जि. जालना, जावेदखान मोहंमद खान वय 45 वर्ष रा. गारखेडा सुतगिरणी छत्रपती संभाजीनगर, प्रकाश आगाजी वाहुळे वय 58 वर्ष रा. दरेगाव ता.जि. जालना, संदीप नारायण चव्हाण वय 43 वर्ष रा. आडगावराजा जि. बुलडाणा, प्रदीपकुमार अर्जुनराव तांबिले वय 57 वर्ष रा. डोणगाव ता. जाफ्राबाद जि. जालना यांना ताब्यात घेण्यात आले असुन, त्यांचेकडील रोख रक्कम व जुगार साहित्य, तसेच घटनास्थळावरील वाहने असा एकुण 34,08,524/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी विरुद्ध सपोनि. योगेश उबाळे, स्थानिक गुन्हे शाखा जालना यांचे तक्रारीवरुन पोलीस ठाणे चंदनझिरा जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments