डॉ.शंकरराव चव्हाण भुयारी मार्ग काळोखात बुडाला
लाखो रुपए खर्चुन व अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर बांधण्यात आलेला मुदखेड शहरातील डॉ.शंकरराव चव्हाण भुयारी मार्गाचा नागरिकांना उपयोग होण्यापेक्षा तो धोक्याचा ठरत आहे. या भुयारी मार्गात आंधार व दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर पाणि साचलेले असुन नालिवरच्या लोखंडी जाळ्या सुद्धा खाली वाकल्या आहेत.त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने दिवसाही सायंकाळी अंधार पडत असल्याने येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढु लागले आहे चोरिंचे प्रमाण देखील वाढले असल्याने या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन भुयारी मार्गातील दिवे चालु करावेत अशी अपेक्षा नागरिकातुन व्यक्त केली जात आहे.शहरातील हा मुख्य रस्ता असुन अनेक वाहने आणि नागरिक या भुयारी मार्गातुन ये-जा करतात पण प्रकाश व्यवस्था नसल्याने ये-जा कशी करावी ही समस्या आहे. हा भुयारी मार्ग सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा मार्ग आहे या मार्गाची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. भुयारी मार्गातील विद्युत दिवे बंद असल्याने वाहनचालक गाडीच्या लाईटचा आधार घेत ये-जा करतात. त्यामुळे प्रवास करताना वाहनचालकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे मुदखेड पालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक आणि प्रवाशांकडुन येत आहे.