Thursday, October 30, 2025
Homeऔरंगाबादबौद्धजन पंचायत समिती सभापती, सर सेनानी मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली...

बौद्धजन पंचायत समिती सभापती, सर सेनानी मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मा. विनोद मोरे यांचा वाढदिवस व सेवानिवृत्ती समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

बौद्धजन पंचायत समिती सभापती, सर सेनानी मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मा. विनोद मोरे यांचा वाढदिवस व सेवानिवृत्ती समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
बोरघर/माणगांव/ बौद्धजन सेवा संघ, दापोली, मंडणगड-मुंबई, बौद्ध सेवा संघ, इलणे शाखा मुंबई, बौद्धजन पंचायत समिती, मध्यवर्ती यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती मा. विनोद सुदाम मोरे, मुक्काम गाव इलणे, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी यांची बॉम्बे हॉस्पिटलमधून सीनिअर टेक्निकल ऑफिसर म्हणून ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर १८ जून २०२५ रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवानिवृत्ती आणि वाढदिवस असा दुहेरी कार्यक्रम इंदू मिलचे प्रणेते सरसेनानी बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, मुंबई १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर प्रसंगी महामानवांना पुष्पहार अर्पण करून मा. विनोद मोरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी विशाखा मोरे यांनी ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरवात केली तद्नंतर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी सुमधुर व गोडवाणीने धार्मिक विधी पूर्ण करीत त्यांनी आपल्या पहाडी आवाजात, प्रभावी भाषाशैलीत कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा सांभाळली. बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत आणि
        सरचिटणीस राजेश घाडगे या दोघांनी अत्यंत लाघवी भाषाशैलीत विनोद मोरे यांच्या कार्याचा आढावा घेणारा लिखित जीवनपट निर्माण केला तर मंगेश पवार यांनी त्या लिखित जीवनपटाचे वाचन सभागृहात करीत विनोद मोरे यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला, सदर कार्यक्रमात विनोद मोरे यांची आई सुरेखाताई मोरे, पत्नी विशाखा मोरे, तीन भाऊ, तीन मुले, सुना, नात असा मोठा परिवार सोबतच इलणेकर भावकी, विविध संघटना, बॉम्बे हॉस्पिटल कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात सभापती आनंदराज आंबेडकर बोलत असताना “विनोद मोरे यांनी सदर ३९ वर्षांच्या सेवेत काय कमावलं तर त्यांनी माणसे कमावली, माणुसकी जपली, अनेकांना मदत केली, रोजगार दिले, रुग्णांची सेवा केली सोबतच सामाजिक, शैक्षणिक
       अश्या सर्व क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला, लहानपणी गावी शिक्षण घेत असता भावकीमध्ये चिटणीस पदापासून ते अध्यक्षपद त्यांनी भूषविले तसेच इलणे केंद्रात सरचिटणीस पदापासून अनेक उच्चपद तसेच बौद्धजन सेवा संघ तालुका दापोली, मंडणगड येथे सरचिटणीस, अध्यक्ष, सभापती अशी अनेक पद त्यांनी भूषविली सोबतच शैक्षणिक क्षेत्रात ही त्यानी उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे, बौद्धजन पंचायत समितीच्या इमारत बांधणीच्या कार्यात ही त्यांचे मोठे योगदान आहे, समितीच्या अगणित सभांचे नेतृत्व त्यांनी करीत आपली कणखर भूमिका मांडत जनमानसात जागृती निर्माण केली व स्मारकनिधीसाठी त्यांना प्रवृत्त केले. बौद्धजन पंचायत समितीमध्ये दाखल झाल्यापासून त्यांनी सरचिटणीस, उपकार्याध्यक्ष, उपसभापती असा
      कार्यभार प्रामाणिकपणे पार पाडला त्यांनी सच्चामनाने बौद्धजन पंचायत समितीवर प्रेम केलं व आपले योगदान दिले ते असेच पुढे रहावे व त्यांची साथ समितीला अशीच लाभत रहावी” असे गौरवोद्गार काढून त्यांच्या अद्भुतपूर्व योगदानाबद्दल कृतघ्नता व्यक्त करीत त्यांच्या ५८ व्या वाढदिवसाच्या मंगलकामना देत पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तद्नंतर इलणे सेवा संघाचे अध्यक्ष मोरे साहेब, अनिल मोहिते, दिलीप रुके, विकासक महेंद्र कांबळे, गटप्रतिनिधी विकास गायकवाड, प्रकाश अहिरे, वंचीत बहुजन आघाडीचे मुंबई चिटणीस सरदार भाई, सम्यक कोकण कला संस्थेचे मंदार कवाडे व सहकारी, जयंती उत्सव मंडळाचे भागूराम पवार व सहकारी, बॉम्बे हॉस्पिटलचे त्यांचे सहकर्मचारी व जवळचे स्नेही संजीवनी यादव, जनार्दन मुरडकर, उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार, अशोक कांबळे, दापोली मुंबई संघाचे सभापती महेंद्र चाफे, विनोद मोरे यांचे जवळचे स्नेही उमाकांत जाधव, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, महिला मंडळाच्या उपाध्यक्षा प्रमिलाताई मर्चडे यांनी आपले विचार मांडीत विनोद मोरे यांना शुभेच्छा दिल्या, सदर कार्यक्रमास कार्यकारी मंडळाचे सर्वच विश्वस्त, सर्वच उपकार्याध्यक्ष, अतिरिक्त चिटणीस, चिटणीस, सर्वच व्यवस्थापक मंडळ,
      कार्यकारी मंडळ, आजी माजी सर्व कार्यकर्ते, महिला मंडळाच्या सुशीलाताई जाधव, आणि सहकारी, निवडणूक मंडळाचे मिलिंद जाधव आणि सहकारी, विवाह मंडळाचे रघुनाथ घाडगे, साळवी व सहकारी, संस्कार समितीचे मंगेश पवार, मनोहर बा. मोरे व सहकारी, पतपेढीचे किशोर मोरे व सहकारी व सर्वच समित्यांचे, शिवडी गटक्रमांक १३ चे माननीय कार्यकर्ते, विनोद मोरे यांचा गटक्रमांक ४३ चे कार्यकारिणी मंडळ आणि स्थानिक शाखा व स्थानिक शाखेचे अध्यक्ष दिनेश हाटे व सहकारी, बॉम्बे नेव्हल डॉक कर्मचारी, बॉम्बे हॉस्पिटल कर्मचारी विविध क्षेत्रातील विविध संघटनांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकांनी अक्षरशः गर्दी केली होती ज्यामुळे हॉलही अपुरा पडला होता अनेकांना शुभेच्छापर विचार व्यक्त करण्यास वेळ देता आला नाही त्याबद्दल विनोद मोरे यांनी दिलगिरी व्यक्त केली, सरतेशेवटी प्रचंड गर्दी असूनही अक्षरशः पायऱ्याऱ्यांवर उभे राहून ही कार्यक्रमास उपस्थिती दिली व अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शांततेत कार्यक्रम पार पाडला त्यामुळे सदर कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने आभार मानून मंगेश पवार यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments