Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादजिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते खरपुडी येथे नीट, जेईई परीक्षेतील...

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते खरपुडी येथे नीट, जेईई परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार संपन्न  

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते

खरपुडी येथे नीट, जेईई परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार संपन्न  

जालना :  खरपुडी येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळ संचलित बळीराजा करियर अकॅडमीत प्रशिक्षण घेवून नीट, जेईई आणि सीईटी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दि.20 जुन 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमास डॉ.राजेंद्र बारवाले, प्रा.सुरेश लाहोटी, प्रा.एखंडे, प्रा.वासरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामीण भागातील परिस्थितीने गरीब असलेल्या हुशार व गरजवंत विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात जावून शिकवणी लावणे शक्य होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील 20 मुली व 20 मुले असे एकुण 40 विद्यार्थ्यांना निवास, भोजन व शिक्षणासाठी इयत्ता अकरावी व बारावी या दोन वर्षासाठी 100 टक्के शिष्यवृत्ती ही प्रवेश पात्रता परीक्षेतून निवडलेल्यांना बळीराजा करियर अकॅडमीकडून देण्यात येते.  यावेळी बळीराजा करियर अकॅडमीची विद्यार्थींनी कु.साक्षी लक्ष्मण काटे हिने जेईई ॲडव्हान्समध्ये चांगली टक्केवारी मिळवून आयआयटीला पात्र ठरली आहे. तसेच नीट परीक्षेत यश संपादन करत ओम अशोक शेळके एम्सला तर विशाल बेवले आदि एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र ठरला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments