आ. प्रशांत बंब, यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज येथे आंतरराष्ट्रीय योग मोहोत्सवाचे आयोजन
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/ प्रतिनिधी/ आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने दिनांक (२१) जून २०२५ रोजी सकाळी (७) वा वाळूज येथे मनीषा नगर लांजी रोड वाळूज येथील मैदानावर जिल्हास्तरीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या आयोजनात नामदार अतुल सावे, मा. खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आमदार प्रशांत बंब, संजय खंबायते, किशोर धनायत, मोना ताई राजपूत, राज्य कार्यकारणी सदस्य, पतंजली , ज्योतीताई गायकवाड माजी सभापती, कैलास पवार, पोलीस निरीक्षक राजेंद्र शहाणे , रवींद्र चव्हाण, सुरेश शिंदे, आदीसह आरोग्य, शिक्षण, महिला बालकल्याण, आधी विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी सर्व शाळा महाविद्यालयांचे संस्थाचालक मुख्याध्यापक आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय योग शिबिराचे आयोजन संपन्न होत असून हे आयोजन व्यापक करण्याच्या दृष्टीने नियोजन समिती, स्वागत समिती, पार्किंग समिती, योग समिती आदी समित्या स्थापन करण्यात येत आहे ,या शिबिरात विविध प्रदर्शन संकल्प ते सिद्धि तक,केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांना बघायला मिळणार आहे या शिबिरात परिसरातील सर्व शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग लाभणार असून मंडळातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तसेच योग प्रेमीनि मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा योग समितीचे संयोजक अविनाश गायकवाड, परसराम बारगळ, सचिन गरड, संजय पांडव, आदींसह तालुका योग समिती ,मंडळ समितीच्या पदाधिकारी नी केले आहे.