Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादमाझा मतरदारसंघ राज्यात एक आदर्श म्हणून ओळख निर्माण करणार -आमदर प्रशांत बंब

माझा मतरदारसंघ राज्यात एक आदर्श म्हणून ओळख निर्माण करणार -आमदर प्रशांत बंब

माझा मतरदारसंघ राज्यात एक आदर्श म्हणून ओळख निर्माण करणार -आमदर प्रशांत बंब
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद  विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शेतीसाठी बंद जलवाहिनीद्वारे मुबलक पाणी,गट शेतीच्या मध्यानातून एकच पिक पध्दत,महिला बचत गटांना स्वयंरोजगार, दळणवळणासाठी रस्ते, गावागावात वाड्या वस्त्यावर सौर ऊर्जा अशा विविध पैलूंवर काम करत असून गंगापूर-खुलताबाद हा माझा मतदारसंघ सर्वांच्या मदतीने राज्यात एक आदर्श म्हणून ओळख निर्माण करणार असल्याचा विश्वास आमदार प्रशांत बंब यांनी बुधवारी (दि.१८) व्यक्त केला.
खुलताबाद
तालुक्यातील गोळेगाव येथील ग्राम पंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे उदघाटन व लोकापर्ण बुधवार (दि. १८) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर तहसिलदार स्वरूप कंकाळ,गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, पंचायत समितीचे माजी उपसभापती दिनेश आंभोरे, सरपंच बबाबाई औटे, उपसरपंच संतोष जोशी यांची उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करतांना आ.बंब म्हणाले की, तालुक्यात बंद जलवाहिनीद्वारे जमिन ओलिताखाली येणार आहे. तालुक्यातील ८० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न सुरु असुव मतदारसंघातील जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शाळेत खाजगी शिक्षक पाठवून त्यांना अबॅकस या गणितीय पद्धतीचे धडे देत असून आता इंग्रजी देखील त्यांना सोप्या भाषेत शिकवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेतील एका एका शिक्षकाला “फोनिक इन मराठी” अर्थात इंग्रजी ही सांकेतिक भाषेत मराठीतून इंग्रजी शिकता येईल असे प्रशिक्षण त्यांना देत असल्याचे सांगितले. यावेळी शहराध्यक्ष परसराम बारगळ, योगेश बारगळ,सुरेश मरकड, यांचे सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments