आचार्य .प्रणामसागरजी महाराज यांचा २०२५ चा चातुर्मास छत्रपती संभाजीनगर शहरात राजाबजार येथे होणार
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी/ श्री.पुष्पगिरी तिर्थ प्रणेता आ.श्री.पुष्पदंतसागरजी महाराज यांच्या उपवनातील सुगंधीत पुष्प व त्यांचे परम आत्मीय शिष्य आचार्य श्री.डॉ.प्रणाम सागरजी महाराज यांचा २०२४ चा चातुर्मास पुण्याजवळील यवत येथे उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर यवत पुणे, नगर, श्रीरामपुर, येवला, चांदवड, नमोकार तिर्थया मार्गाने विहार सुरâ असुन राजाबजार जैन पंचायतच्या वतीने त्यांन वेळोवेळी चातुर्मास निमीत्त्त छत्रपती संभाजीनगर येथे आगमन करावे यासाठी श्रीफळ अर्पण केले होते पंचायतच्या विनंतीला मान देवुन आचार्यश्रींनी नमोकार तिर्थ येथे आचार्य देवनंदीजी गुरूदेव यांच्या सानिध्यात प्रवचनातुन २०२५ चा चातुर्मास छत्रपती संभाजीनगर येथील श्री.खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर राजाबजार येथे होईल अशी घोषणा केली. यावेळी पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी, सचिव प्रकाश अजमेरा,विश्श्वस्थ महावीर ठोले, अरूण पाटणी, निता ठोले, चंदा कासलीवाल, संजु पहाडे, कचनेर कार्यकारणी सदस्य संजय पहाडे, प्रकाश कासलीवाल मेघा अजमेरा पुजा पहाङे आदींची उपस्थिती होती.
आचार्य श्री नमोकार तिर्थ चांदवड, मनमाड, नांदगांव, न्याय डोंगरी, बोलठाण, शिवुर, लोणी, देवगांव, वेरूळ, जटवाडा, श्री.क्षेत्र कचनेर या मार्गाने दिनांक २९ जुन रोजी शहरात प्रवेश करणार असुन त्यांच्या स्वागतासाठी भव्य तयारी राजाबजार जैन मंदिरात करण्यात येत आहे. आचार्य श्री.डॉ.प्रणामसागरजी महाराज हे आ.पुष्पदंत सागरजी महाराज यांचे परम आत्मीय शिष्य असुन त्यांना २०१९ ला पुष्पगिरी तिर्थ येथे आचार्य पद बहाल करण्यात आले असुन त्यांनी जैन समाजातील अत्यंत महत्वाचे मानले जाणारे भक्तांबर स्त्रोत्र या विषयावर पी.एच.डी केली असुन त्यांना भक्तांबरा विषयी लगाव आहे. त्यांच्या आगमनाने व चातुर्मासाने छत्रपती संभाजीनगर येथील समाजात चैतन्यमय वातावरण निर्माण होणार असुन २०२२ रोजी त्यांचे गुरूबंधु आचार्य पुलकसागरजी महाराज यांचाही चातुर्मास छत्रपती संभजीनगर शहरात झाला आहे. अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी दिली आहे.
चातुर्मास यशस्वी करण्यासाठी खंडेलवाल दिगंबर जैन समाज व विश्श्वस्थ मंडळाचे अध्यक्ष महावीर पाटणी, सचिव प्रकाश अजमेरा, विश्श्वस्थ , किरण पहाडे, अरâण पाटणी, महावीर ठोले, अॅड.यतीन ठोले, संतोष सेठी, जितेद्र पाटणी, ललीत पाटणी चंदा कासलीवाल, निता ठोले यांच्यासह सर्व अंतर्गत मंदिराचे पदाधिकारी विशेष प्रयत्न करीत आहे.