आश्रम शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/प्रतिनिधी/ वि.जा.प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा घानेगाव तांडा प्रशालेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला.या प्रसंगी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत हे गुलाब पुष्प देऊन करण्यात आले नंतर विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी माध्यमिकचे मुख्याध्यापक संजय पाटील , प्राथमिकचे मुख्याध्यापक दिवाकर लवांडे सहशिक्षक सुनिल कवीश्वर , मनोज पाटील , देवचंद बागुल , प्रविण पवार व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.