जीतो लेडीज विंग झायका तर्फे पाककृती प्रतियोगीता प्रतिसाद
छत्रपति सभाजीनगर/प्रतिनीधी/ जीतो लेडीज विंग, सि एस एन छत्रपति सभाजीनगर आयोजित झायका – “पाच का दम” या बहुप्रतीक्षित कार्यक्रमात, 13 जून रोजी उत्साहात पार पडला. जैन पाककलेचा सुगंध आणि सर्जनशीलतेची चव अनुभवायला मिळाली
स्पर्धेत एकूण ९ सहभागी होत्या आणि ३७ प्रेक्षकांनी या चविष्ट कार्यक्रमाचा आनंद घेतला. सहभागींसमोर स्टार्टर, स्मूदी, भाताचे प्रकार, पनीरची भाजी आणि गोड – असे पाच जैन प्रकार बनवण्याचे आव्हान होते.
हा कार्यक्रम रचना पहाडे यांनी प्रायोजित केला होता. व शेफ पूनम बिंद्रा व शेफ समय जी चूडीवाल यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धा खूपच अटीतटीची झाली होती आणि प्रत्येक श्रेणीतून उत्कृष्ट पदार्थ निवडणे परीक्षकांसाठी खूपच कठीण झाले होते.
भाग्यश्री कटारिया यांना झायका क्वीन चा पुरस्कार मिळाला, तर रंजना जैन यांना रनर-अप घोषित करण्यात आले.
इतर सर्व सहभागी – नेहा बागरेचा, वंदना काकरीया या, पलक गंगवाल सर्वोत्तम गोड पदार्थ), भारती पगारिया, नेहा संकलेचा व रीना संचेती – यांना त्यांच्या-त्यांच्या श्रेणीत पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अनीता रुनवाल व मंजुषा कासलीवाल यांनी केले संयोजक आणि सह-संयोजक म्हणून उत्तम रित्या पार पाडले मंगलाचरण प्राची पाटनी ने केले
अध्यक्षा प्रिया मुथा व मुख्य सचिव सोनल जैन यांनी आपले मार्गदर्शक शब्द सांगून सहभागींचा आत्मविश्वास वाढवला. उपाध्यक्षा प्रीति बाकलीवाल व कोषाध्यक्ष डॉ. प्रियांका संघवी यांनी देखील कार्यक्रमाच्या यशात मोलाचे योगदान दिलेकेवळ ६ महिन्यांत जीतो लेडीज विंग, सी एस एन औरंगाबादने २० प्रभावी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले — ही त्याच्या समर्पणाची, सातत्याची आणि सशक्त स्त्रीशक्तीची खरी ओळख आहे.”प्रेसिडेंट प्रिया मुथा यांच्या घोषणेनुसार,उडान, सक्षम आणि स्वयम या उपक्रमांतर्गत लवकरच विविध नवीन प्रकल्प सुरू करण्यात आहे