Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादअंतुर किल्ल्यावर शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्य

अंतुर किल्ल्यावर शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्य

अंतुर किल्ल्यावर शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्य

कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील अंतूर किल्ल्यावर ४४ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेदरम्यान उघडकीस आली. ईश्वर भगवान सूर्यवंशी (रा. बेलखेडा, ता. कन्नड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.अंतूर किल्ला परिसरातील सागाच्या झाडाला ईश्वर सूर्यवंशी या व्यक्तीने गळफास घेतल्याची माहिती पिशोर पोलिसांना मिळाली. यावरून जमादार सुनील भिवसने, भताने यांनी घटनास्थळी
भेट दिली. सदरील इसमास उपचारासाठी पिशोर ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. गुरुवार सायंकाळपासून ते बेपत्ता होते. शुक्रवारी नातलग शोध घेत अंतूर किल्ल्यावर आले होते. अद्याप त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, सूर्यवंशी शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. हात उसनवारी व इतर कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. यातूनच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे नातेवाइकांनी सांगितले. सूर्यवंशी यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. मृत्यूची नोंद  पिशोर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अमलदार सुनील भिवसने करीत आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments