Sunday, October 26, 2025
Homeअग्रलेखप्रेसनोट

प्रेसनोट

प्रेसनोट

मा. संपादक,

आज दिनांक १३-०६-२०२५ शुक्रवार रोजी जालना – छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)लोकसभा मतदारसंघाचे  खासदार डॉ. कल्याण काळे यांनी जालना ड्रायपोर्टचा पाहणी दौरा करून तेथील कामाचा सविस्तर आढावा घेतला यावेळी ड्रायपोर्टचे सिद्धेश बियाणी जालन्याचे उपविभागीय अधिकारी श्री हदगल जालना तालुक्याच्या तहसिलदार श्रीमती छाया पवार हजर होत्या यावेळी चौकशीत असे सांगण्यात आले कि, ड्रायपोर्टचे सर्व परवाने मिळवण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे व येत्या दोन महिन्यात येथे प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होईल असे सांगण्यात आले. तसेच यानंतर मा. खासदार मोहोदयांनी पत्रकार परिषद घेऊन मागील एक वर्षाच्या कामाचा आढावा मा. खासदार मोहोदयांनी मांडला त्यात प्रामुख्याने ड्रायपोर्ट, रेल्वे विभाग, भारत संचार निगम लि. (BSNL) अंबड बायपास तसेच मागील १० वर्षापासून भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील MRGS अंतर्गत मिळणाऱ्या विहिरींचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नव्हता तो दिशा समितीच्या बैठकीत मुद्दा घेऊन सदर शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ देण्याचे संबंधित यंत्रणेलाआदेशित करण्यात आले.व आता सन २०२४-२५ मध्ये भोकरदन तालुक्यात ४०३४ शेतकऱ्यांना व जाफ्राबाद तालुक्यात ३४० शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात आला. शेतकऱ्यांना खते वेळेवर मिळण्यासाठी संबंधित यंत्रणेची बैठक घेऊन सूचना करण्यात आल्या. ICT इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी कॉलेजची आढावा बैठक घेऊन सदरील कॉलेज मार्फत जालना शहरातील स्टील कंपन्यानमुळे व MIDC मधील प्रदूषणावर कायमस्वरूपी उपाय काढण्यासाठी प्रोजेक्ट सादर करण्याच्या सूचना केल्या तसेच शेतकऱ्यांच्या मोसंबी वर मोसंबी जूस वर प्रक्रिया करून ती जास्त दिवस कशी टिकवता येईल तसेच शेतकऱ्यांचे पिक काढणी नंतर वेस्ट जाणारे मटेरियल वर प्रक्रिया करून शेतकऱ्यांना दोन पैसे कसे जास्तीचे मिळतील यावर कांम करण्यास सांगितले. तसेच सदर प्रोजेक्ट साठी लागणारी आर्थिक मदत मिळवून देण्याची खात्री दिली. CCI मार्फत कापूस खरेदी केंद्रे सुरु करण्यासाठी व सदर केंद्रांना मुदतवाढ देण्यासाठी पाठपुरावा केला.

                   जालना जिल्ह्यातील बँकांना 2025-26 खरीप हंगामासाठी जिल्ह्याचा एकूण पीक कर्ज वाटप लाक्षांक ₹१३२० करोड एवढा निश्चित करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील विविध बँकांचा १८८ शाखांचा समावेश असून शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात बँकांकडून अनेक प्रकारे शेतकर्यांची अडवणूक करण्यात येते त्याबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी व शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज उपलब्ध होण्यासाठी खासदार मोहोदायामार्फत हेल्पलाईन क्रमांक  9765974506 देण्यात आला व पीककर्ज मिळवण्यात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण आली तर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सदरील क्रमांकावर संपर्क साधावा  असे आवाहन खासदार डॉ.कल्याण काळे यांनी केले.

                      तसेच BSNL मार्फत जि.प. शाळेतील दत्तक विद्यार्थी योजनेवर खासदार मोहोदयांनी प्रकाश टाकला, सदरील योजनेबाबत प्रत्येक जि.प. शाळेतील किमान ५ विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांची इंटरनेट ची फीस BSNL कडे जमा केल्यास सदरील जि.प. शाळेस BSNL मार्फत इंटरनेट जोडणी देण्यात येते. यावेळी जालना तालुक्याचे माजी आमदार श्री कैलाससेठ गोरंटयाल, जालना जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री राजाभाऊ देशमुख, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री राजेन्द्र्जी राख, महिला कॉंग्रेस कमिटीच्या जिल्हाअध्यक्ष श्रीमती नंदाताई पवार, राम सावंत,जि.प.चे माजी सभापती जयप्रकाश चव्हाण, माजी सभापती रामधन कळंबे, बदनापूर कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्ष श्री सुभाष मगरे, जालना पं.स.चे माजी सभापती सोपानराव तिरुखे, राम शिरसाठ,अरुण पैठणे,विश्वंभर तिरुखे, ज्ञानदेव इंगोले आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments