कन्नड तहसील कार्यालयावर “उबाठा ” शिवसेनेचा धडक मोर्चा
कन्नड उदय कुलकर्णी.
कन्नड तालूका “उबाठा” गट शिवसेनेच्या वतीने दि.10 रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ना.आंबादास दानवे यांचे आदेशानुसार राज्य शासना विरुद्ध” क्या हुवा तेरा वादा” “आशा जोरदार घोषणा देत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता.
फसव्या शासनातील महायुतीने निवडणुकीच्या कालावधीत बळीराजा दिलेली फसवी आश्वासने नुसतीच हवेत विरली असुन ना बळीराजाचे कर्ज माफ झाले ना, एका रुपयात पीक विम्याची अंमलबाजवणी झाली.इतकेच नव्हे तर लाडक्या बहिणींनाही वाऱ्यावर सोडले, 25 लाख बेरोजगारांना नवीन नौकऱ्यांचे दिलेले आश्वासनही फसवे निघाले,ते घोषणा करतांनी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी मतदार राजास इतरही बरीच खोटी आश्वासने देऊन मतदार राजाचे तोंडास पाने पुसली आहे. या सर्वाचा जाब विचारण्यासाठी उबाठा शिवसेना पक्षाचे वतीने शहरातील पिशोर नाका, आण्णाभाऊ साठे चौक ते तहसील कार्यालय पर्यंत या ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.यात शासना विरुद्ध देण्यात येणाऱ्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.सदर मोर्चा तहसील कार्यालयात धडकताच नायब तहसीलदार श्री. सोनवणे,शहर पो.नि.रघुनाथ सानप यांनी मोर्चे करांचे निवेदन स्वीकारून पुढील कार्यवाही साठी शासनाकडे पाठविले आहे.या बोंबाबोंम मोर्चात पक्षाचे तालुक्याचे सर्वेसर्वा मा.जि.प.अध्यक्ष डॉ.आण्णासाहेब शिंदे,तालूका प्रमुख संजय मोटे,शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब मोहिते,युवा सेना ता.प्रमुख योगेश पवार,भरत मिसाळ, गणेश शिंदे, सतीष जिवरख, कल्याण चव्हाण, संतोष पवार,नवनाथ राठोड, विश्वनाथ त्रिभुवन, ज्ञानेश्वर वेताळ, मोहन पवार,आकाश गीते, बाबासाहेब नलावडे, राहुल गायकवाड,चंद्रभान शेलार, यशवंत खुडे,एम.चव्हाण, संजय विखणकर, सोमनाथ मट्ठे, योगेश गवळी, संतोष बोर्डे, गणेश भिंगारे, सुनील घोरपडे,लक्ष्मीकांत खरे, बाळू खरे सह पक्षाचे अनेक पदाधिकारी, शिवसैनिक बेरोजगार युवक व मोठ्या संख्येने तालुक्यातील बळीराजा सहभागी झाला होता.शहर पोलीस दलाने शांतता राखणेसाठी या परिसरात चोक बंदोबस्त तैनात केला होता.