वटसावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
कन्नड /प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील जवखेडा बु परिसरामध्ये मोठ्या उत्साहात वडाच्या पूजनानंतर सुवासिनींनी एकमेकींना हळदी कुंकू देऊन, ओटी भरून दि.१० जुन मंगळवारी वटपौर्णिमा साजरी केली. यावेळी प्रत्येक महिलेने आपल्या गाव परिसरामध्ये वृक्ष लावण्याचा संदेश एकमेकांना दिले. महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून मानला जातो. सौभाग्यवती स्त्रियांकडून पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून व्रत केलं जातं आज सकाळ पासूनच सुवासिनींनी वडाचं झाड असलेला परिसर गजबजून फुलून गेला होता. अनेक ठिकाणीच्या परिसरात वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून पुजा करून वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
