Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादअग्रसेन विद्या मंदिर शाळेत यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

अग्रसेन विद्या मंदिर शाळेत यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

अग्रसेन विद्या मंदिर शाळेत यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
छत्रपती संंभाजीनगर/प्रतिनिधी/ पैठण रोड येथील अग्रसेन विद्या मंदिर शाळेत शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील इयत्ता 1 ली ते 10 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा दि.05 जून रोजी आयोजित करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे इयत्ता 1 ली ते 9 वी मधील सर्व तुकड्यामधून सर्वप्रथम येणार्‍या विद्यार्थ्यास सायकल देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेने इयत्ता 10 वी मधील आपल्या नेत्रदिपक यशाची परंपरा कायम राखत यश संपादन केले. या वर्षी विद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा मान स्वराज सुर्यवंशी (97.20%) याने मिळवला त्याचा शाळेतर्फे सन्मान पत्र व लॅपटॉप देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे वेदश्री खडके (97%) हिने द्वितीय स्थान मिळवले तिचा शाळेतर्फे सन्मान पत्र व रोख रु.11,000/- देऊन सत्कार करण्यात आला, प्रज्योत अग्रवाल व प्राप्ती पवार (95.80%) यांनी विभागून तृतीय स्थान पटकावले त्याचा सत्कार प्रत्येकी सन्मान पत्र व रोख रु.5,000/- देऊन करण्यात आला.
कार्यक्रमात सुरूवातीला माता सरस्वती, भगवान श्री गणेश व छत्रपती महाराजा अग्रसेन यांच्या प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे विश्वस्त केशवजी लीला, शाळा समितीचे अध्यक्ष सच्चानंदजी अग्रवाल, उपाध्यक्ष गोकुळजी अग्रवाल, सचिव निधीजी विजयजी अग्रवाल, कोषाध्यक्ष पंकजजी अग्रवाल, सदस्य संतोषजी डी. धानुका, अग्रवाल सभा अध्यक्ष कुंजबिहारीजी अग्रवाल, शाळा समितीचे माजी अध्यक्ष राजकुमारजी टिबडेवाला, प्रीतेशजी धानुका यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील गुणवंतांचा सत्कार व कौतुक सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी यशवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी शाळेचे प्राचार्य संतोष कुमार करवा यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व नेत्रदिपक कामगिरीच्या सातत्याचा आशिर्वाद व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शिस्तबद्ध आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य संतोष कुमार करवा व उपप्राचार्या मयुरी लोगलवार, अधीक्षक अजय सोनुने यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन सर्व विभागांचे विभाग प्रमुख व इव्हेंट विभागप्रमुख विक्रम शर्मा यांनी केले. कार्यक्रमाच्या संपन्नतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अविरत परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सुमीत पाटील यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments