राज्यातील जनतेला  दिलेल्या आश्वासनाची आठवण करत   *क्या हुआ तेरा वादा* शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 
आत्ताच एक्स्प्रेस
फुलंब्री/ प्रतिनिधी/ मराठवाड्यातील  बांधवांच्या वतीने काल दिनांक ५ जुन गुरुवार २०२५ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शासकीय अधिकार्यांच्या माध्यमातुन सरकारला आठवण देत क्या हुआ तेरा वादा अशी आठवण करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री
 अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. महायुती सरकारने मोठ्या गाजावाजाने जाहीर केलेल्या अनेक योजना आणि दिलेली आश्वासने आज केवळ कागदावरच राहिली आहेत. यामुळे शेतकरी व नागरिक प्रचंड निराशेच्या गर्तेत ढकलली गेली असून, अनेक मूलभूत समस्यांनी डोके वर काढले आहे. याबद्दल तीव्र संताप व्यक्त करत, खालील प्रमुख मुद्द्द्यांवर तात्काळ लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी करत आहे.
 
सत्ताधारी तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांना लगोलग कर्जमाफी देण्याचा गाजावाजा केला, तसेच वेळेत कर्जफेड शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा पत्ता नाही. सरकारने सरड्याला लाजवेल इतका वेगाने रंग बदलला. कर्जमाफीच्या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक वर्ष संपत आले असताना कर्ज भरण्यासाठी सांगून अर्थमंत्री अजित पवारांनी त्यांची क्रूर थट्टा केली. याचाच परिणाम म्हणून, गेल्या सात महिन्यांत राज्यात १०००  पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकऱ्यांच्या मार्फत राज्याच्या तिजोरीत जाणारा जीएसटी अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना परत करण्याच्या बाता मारल्या, मात्र जीएसटी अद्याप शेतकऱ्यांच्या वाट्याला आलाच नाही. व तसेच शेतकऱ्याच्या सरकारने आत्महत्या करण्याच्या वाटेला आणलेले आहे असा सरकारच्या विरोधात निशेध करत आहोत. लाडकी बहिणीचे पैसे २१०० देणार आहे असे म्हणत फक्त १५०० रूपये बहीणीच्या खात्यात येत आहे.
एक प्रकारे लाडक्या बहीणीची फसवणूक केली जात आहे.
म्हणून या विरोधात औरंगाबाद जिल्हाभरात आंदोलन छेडण्यात आले .
या प्रसंगी
जगनाथ पा. पवार औरंगाबाद उप जिल्हा प्रमुख ,  सोमिनाथ पाटील करपे – फुलंब्री तालुका प्रमुख
राधाकिसन पाटील कोलते – उप-तालुका प्रमुख प्रमुख  श्रीराम म्हस्के उप-तालुका प्रमुख
 गोविंद लहाने -उप-तालुका प्रमुख
 प्रदिप गाडेकर विभाग प्रमुख
कैलास जाधव विभाग प्रमुख
उमेश दुलोंडे शहर प्रमुख प्रविण ऐखंडे तालुका प्रमुख कामगार सेना
गणेश जाधव शाखा अध्यक्ष  अप्पाराम कापरे शाखा प्रमुख
आयुब पटेल – युवा शहर प्रमुख
समाधान , योगेश सिरसाठ यांच्या सह आदींची उपस्थिती होती.