Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादगुणवंत खेळाडु विद्यार्थ्यी यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन

गुणवंत खेळाडु विद्यार्थ्यी यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन

गुणवंत खेळाडु विद्यार्थ्यी यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन

जालना/प्रतिनीधी/ कला क्रीडा दुत फ ाऊंडेशन महाराष्ट्र, जालना जिल्हा ऑलंम्पीक असोसिएशन व शिशु विहार इंग्लिश स्कुल जालना यांच्य संयुक्त विद्यमाने सन 2025 मध्ये  दहावी व बारावी उत्तीर्ण क्रीडापटु/खेळाडु यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शालेय शिक्षण पुर्ण करत असतांनांच जे सतत मैदानवर असतात व आपल्या क्रीडा कौशल्याने ज्यांनी शालेय अथवा असोसिएशन द्वारा आयोजीत होणार्‍या विविध स्पर्धांमध्ये कमीत कमी विभागस्तर किंवा राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य किंवा सहभाग नोंदवीला असेल व ज्यांना या वर्षीच्या निकालामध्ये कमीत कमी 80 टक्क्यापेक्षा जास्त गुण असतील असे सर्व खेळाडु मग ते कोणत्याही बोर्डाचे असो या सत्कार सोहळ्याकरीता पात्र असतील.
क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवीण्याकरीता तसेच त्यांना प्रोत्साहीत करण्या करीता सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नांव नोंदणी करीता दहवी/बारावीची गुण पत्रीका, खेळाचे प्रमाणपत्र व आधार कार्ड यांची झेरॉक्स पीडीएफ  स्वरूपात पाठवावी. तरी जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडु विद्यार्थी यांनी या सत्कार सोहळ्याकरीता 10 जुन 2025 पर्यंत नांव नोंदणी करावी असे आवाहन कला क्रीडा दुत फ ाऊंडेशन महाराष्ट्र, जालना जिल्हा ऑलंम्पीक असोसिएशन व शिशु विहार इंग्लिश स्कुल जालना तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहीतीसाठी शेख चाँद पी.जे. मो.नं. 9822456366 यांच्याशी सकाळी 11 ते संध्या 5 दरम्यान संपर्क साधावा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments