आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर /प्रतिनिधी/ गंगापूर तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी श्रावणबाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी फायली दाखल केल्या आहेत परंतु ते फायली दोन – दोन वर्षे मंजूर करण्यात येत नाही. व अधिकारी व काही दलाल लाभार्थींची लूट करीत आहेत ही लूट तात्काळ थांबवावे व तसेच संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या फायली तात्काळ मंजूर करण्यात यावी या मागणीसाठी गंगापूर तहसील कार्यालय समोर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनाच्या वतीने तहसीलदार यांचा दहावा व तेराव्याचा कार्यक्रम आंदोलन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते बोलत होते पुढे बोलताना सांगितले की संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या विभागातील अधिकारी यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिले आहे. की पुढील एक महिन्यात जेवढे काही प्रलंबित फायली आहे तेव्हढे मंजूर करण्यात येतील. पुढील एक महिन्यात आमच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही तर आमची आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल व वर्षे श्राद्ध कार्यक्रम आंदोलन करण्यात येईल असे आंदोलन कर्ते यांनी सांगितले. तसेच गंगापूर तहसील कार्यालयामध्ये दलालांचा रोष वाढलेला आहे तहसीलदार यांनी दलालांचा तात्काळ बंदोबस्त करावे. यासाठी आम्ही तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार देखील केलेली आहे परंतु अद्याप कोणतिही कार्यवाही तहसीलदार यांच्याकडून करण्यात आलेली नाही. दोन-दोन वर्षापासून संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी दिलेल्या फायली मंजूर करण्यात येत नाही यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनांचे कार्यकर्ते व दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते.