Friday, October 31, 2025
Homeऔरंगाबाद  आमदार अ. सत्तार गटाला मोठा धक्का

  आमदार अ. सत्तार गटाला मोठा धक्का

   आमदार अ. सत्तार गटाला मोठा धक्का

 

आमखेडा ग्राम पंचायत सरपंच गजानन ढगे अपात्र

आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/ प्रतिनिधी/आमदार अब्दुल सत्तार यांचे खंदे समर्थक युवा नेतृत्व आमखेडा ता. सोयगाव जि.छ. संभाजीनगर ग्राम पंचायत सरपंच गजानन लक्ष्मण ढगे यांनी पदाचा दूरऊयोग करून शासकिय जागेवर अतिक्रमण केल्याचे ग्रा.पं.सदस्या नंदाबाई संजय आगे यांनी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी यांचे कडे पुराव्यासह तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने ग्रा.पं. अधिनियम १९९८ चे कलम १४ (१) ज – ३ व १६ मधील तरतुदीनुसार ग्रा. पं. आमखेडा चे सरपंच यांना सदस्य पदावरून तात्काळ अपात्र ठरवण्याचे आदेश सोमवारी (ता. २६ ) देण्यात आल्याने ढगे याचे सदस्यपदासह सरपंच पद गेले असुन सदरचे पद हे रिक्त घोषित करण्यात आले आहे. ढगे हे एकनाथ शिंदे (शिव सेनेचे) आ.अब्दुल सत्तार गटाचे खंदे समर्थक असुन अ.सत्तार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
नंदाबाई आगे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांच्या यांचे आदेशावरून गटविकास अधिकारी, सोयगाव तहसीलदार यांना आदेश देत या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असता ६ फेब्रुवारी २०२५ रोजी संयुक्त अहवाल सादर करण्यात आला होता मुद्दा क्र.‌ ७ व्दारे चौकशी समितीने निष्कर्ष नोदवला की, ग्रा. पं. सरपंच ढगे यांनी उमेदवारी फॉर्म भरते वेळी सन २०२१ मध्ये देखील ज्या ग्रा. पं. मिळकती मध्ये तक्रारीत अर्जात वर्णन केले होते त्याचे मिळकतीचे वर्णन मिळकत क्र. २०६ चे प्रत्यक्ष जागेवर १७ जानेवारी २०२५ रोजी जायमोक्यावर जाऊन स्थळ पाहणी करून जागेची लांबी रूंदी पूर्व पश्चिम २९.०४ फुट व उत्तर दक्षिण १३ फूट म्हणजे ३८२.२० चौ.फूट जागा आढळली शौचालय ०३ बाय ०४ फुट जे कि १२ चौ.फुट एकूण ३९४ चौ.फुट जागा आढळली जे कि नमुना नं. ०८ आकारणी वर्षं सन २०२३ ते २०२७ हे असून यात मालकी हक्कापेक्षा जास्त जागा आढळून आली नाही. सरपंच ढगे यांनी पदावर असताना सौ. मनीषा लक्ष्मण ढगे यांचे नावे मिळकत क्र. ११३२ चे खरेदी खत केल्याचा पूरावा दिसून आला २६ जुलै २०२३ व ठराव क्र. ७/११ मिळकत मध्ये सरपंच ढगे सध्या वास्तव्यास आहेत मिळकत क्र. १९३२ चे मालक सन २०२४ – २०२७ या प्रकरणी वर्षांमध्ये नमूना नं. ०८ ला गावित भिमसिंग असे नांव अभिलेखात आहे, जे कि सरपंच ढगे यांचे नावे आढळून आले नाही. मात्र अभिलेखे तपासणी केली असता मासिक सभा २६ जुलै २०२३ व ठराव क्र. ७/११ या ठरावानुसार दुय्यम निबंधक सोयगाव यांचेकडून १८ मे २०२३ सौ.मनिषा गजानन ढगे यांचे नावे कायम खरेदी खत केलेलें आहे जे कि मिळकत क्र. ११३२ असुन एकुण क्षेत्रफळ १११.५२ चौ. मिटर लोड बेरिंग ८०० चौ फुट व बखळ जागा ४०० चौ. फुट व जागेच्या चतु.सिमा पूर्वेस नाला पच्छीमेस ग्रा. पं. अंतर्गत रस्ता दक्षिणेस रस्ता तर उत्तरेस गोविदा ढगे यांची जागा दर्शविलेली आहे संबंधित जागेचा ग्रा. पचायतीने फेरफार करण्याचा मासिक सभा २६ जुलै २०२३ ठराव क्र. ७/११ असुन तो पारित केलेला असुन तत्कालीन ग्रामसेवक नं.नं.०८ च्या च्या रजिस्टला नोंदणी केलेली नाही. पुर्व पश्चिम ५४.६ फुट, उत्तर – दक्षिण ५६ फुट जी सरासरीने ५१.८ आढळून आले ज्याचे एकुण चौ फुट २९००.८ फुट होतात सरपंच ढगे व कुटुंबाने मिळकत क्र. १९३२ ची खरेदी दुय्यम निबंधक सोयगाव यांचेकडून १८ जुलै २०२३ रोजी कायम खरेदी खत पेक्षा पूर्वेस नाल्याच्या बाजुने व दक्षिणेस ग्रा पं. अंतर्गत सरकारी रस्त्यावर खरेदी खत क्र. ७३५ ता. १८ जुलै २०२३ नुसार १७००.८ चौ फुट जागा अतिक्रमण केल्याचे जायमोक्यावर केलेल्या पंचनाम्यात दिसून आले आहे. या कारणांमुळे सरपंच ढगे यांना महाराष्ट्र अधिनियम १९९८ चे कलम १४ (१) ज – ३ व १६ मधिल तरतुदीनुसार ग्रा.पं. आमखेडा चे सदस्य पदावरून तात्काळ ठरवण्यात आले आहे. सदरचे पद रिक्त घोषित करण्यात येत आहे. असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments