उत्कर्ष नगर भागात पाईप लाईन उपलब्ध करून द्या- रा.कॉ.महिला आघाडीची मागणी
जालना /प्रतिनीधी / शहरातील उत्कर्ष नगर भागात पिण्याच्या पाण्यासाठी पाईप लाईन नसल्याने नागरिकांना विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने सदरील भागात पाईप लाईन उपलब्ध करून द्या अन्यथा ११ जून पासून महानगरपालिके समोर महिलांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर शाखेच्या वतीने मनपा आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शन खाली आज शहर अध्यक्ष रिंकल तायड व मनकर्णा डांगे यांच्या नेतृत्वात उत्कर्ष नगर भागातील महिलांनी महानगर पालिका आयुक्त यांना मागण्याचे निवेदन दिले.त्यामध्ये भागातील पाण्याच्या गंभीर समस्येचा उल्लेख आहे.वार्ड मधील सर्व पाण्याचे सोर्स मधून 4000पेक्षा जास्त क्षार युक्त पाणी येत असल्यामुळे ते पीता येत नाही, परिणामी नागरिकांना पिण्यासाठी व अंघोळीसाठी विकतचे पाणी घ्यावे लागते . शहरातील हा भाग असूनही या कडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्या मुळे या भागात कावीळ , डायरिया,केशगळती या सारखे रोग उदभवत आहेत. त्यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. महानगरपालिकेला या पूर्वी पण निवेदनाद्वारे सदरील प्रश्न सोडविण्याबाबत विनंती केली होती .परंतु आपण अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही हि गंभीर बाब आहे. या भागातील पाण्याची जैविक व अजैविक तपासणी करण्यात यावी तसेच या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी पाईप लाईन उपलब्ध करून द्यावी , अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष , महिला आघाडीच्या वतीने दिनांक 10 जून २०२५ पासून मनपा समोर महिलांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल , अशा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर शहरअध्यक्ष रिंकल तायड, माजी नगर सेविका मनकर्णा डांगे,उपाध्यक्ष संगीता रोकडे, वार्ड अध्यक्ष पुष्पाताई राऊत , मीरा हांडे , शोभाताई डॉ . रेणुका खेडेकर,नागे,तेजस्वीनी बुंदेले, अंजली पिसे, मीराताई खरात ,शोभाताई प्रेमभारती , बेबीताई त्रिवेदी, नीता जाधव, वर्षाताई ठोंबरे , दिपालीताई वानखेडे, सुजाता औटे, लक्ष्मीताई केशापुरे, मनीषाताई केशापुरे, शारदा गोकुलवार, मीरा मोहिते, अश्विनी चित्राल, यांच्या सह अनेक महिलाची मोठ्या संख्येने उपस्थित होते.