घाटनांद्रा/ प्रतिनिधि:सिल्लोड तालूक्यातील अंधारी येथील एका पन्नास वर्षीय भाविकाचा केदारनाथ येथे दर्शन रांगेत असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने मुत्यू झाला. ही घटना शनिवारी केदारनाथ ( उतर प्रदेश) येथे घडली. मुत्यू व्यक्ति चे नाव काशिनाथ सांडु तायडे ( ५० ) वर्ष असे होते मुत्यू भाविकांचे नाव असुन ते शुक्रवारी पत्नीसह केदारनाथ यात्रेला गेले होते. मुत्यु भाविक काशिनाथ तायडे शनिवार ( दि. १७ ) केदारनाथ पोहचले होते दर्शन रांगेत असताना त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका झाला. यात त्यांचा मुत्यू झाला. त्यांच्यासोबत पत्नीसह गावातील तीन ते चार भाविक होते. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुत्यू भाविकाला रूद्र प्रयाग येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले तेथे शवविच्छेदन करून मुतदेह रूग्णावाहिकेने दिल्ली येथे आणला. तसेच रविवारी तेथून विमानाने शिर्डी येथे आणला तेथुन रूग्णावाहिकेने सायंकाळी सहाच्या सुमारास सिल्लोड तालूक्यातील अंधारी या गावी आणला दरम्यान या घटनेने गावावर शोकाकुल पसरली आहे. त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अत्यंसस्कारा करण्यात आले. मुत्यू व्यक्तिच्या पक्षात आई,वडिल,पत्नी, दोन मुले एक मूलगी असा परिवार आहे. त्यांच्या अत्यंसस्काराच्या वेळे अंधारीसह परिसरातले भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.