लासुर स्टेशन येथे भारत शौर तिरंगा यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
भारत माता की जय जय च्या घोषाने लासुर नगरी दुमदुमले आ. प्रशांत बंब, आजी माजी सैनिकांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा यात्रा संपन्न.
दैनिक आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर /प्रतिनिधी /फिरोज मन्सुरी गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथे राष्ट्रप्रेमाची प्रचिती देणारी भारत शौर तिरंगा यात्रा लासूर नगरीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली…””हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा”, वंदे मातरम, भारत माता की जयच्या उद्घघोषाने लासुर स्टेशन दुमदुमले. ऑपरेशन सिंदूर च्या यशानंतर भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ तसेच माय माऊलियांच्या कुंकवाच्या रक्षणार्थ ( दि.२५ ) मे रविवार रोजी सकाळी आ प्रशांत बंब तसेच सीमेवर सवरक्षण करणाऱ्या आजी माजी सैनिकांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वपक्षीय तिरंगा यात्रा काढण्यात आली. दरम्यान लासुर स्टेशन येथील देवगाव रोडवरील छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन व पुष्पहार अर्पण करून तिरंगा यात्रेस सुरवात करण्यात आली. पुढे लोकशाहीर आण्णा भाऊसाठे, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार व अभिवादन करून मुख्य रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकात येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आ बंब यांनी आलेल्या आजी माजी सैनिकांचा सत्कार करून त्यांना अभिवादन केले. देश सेवेसाठी ज्यांनी आपले बलिदान दिले शूर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने या तिरंगा यात्रेची समाप्ती करण्यात आली दरम्यान यावेळी लासुर स्टेशन परिसरातील मोठ्या संख्येने महिला तसेच नागरिक विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.