सदर बातमी व फोटो प्रसिद्धीस द्यावी ही विनंती
डॉ. संभाजी खराट यांच्या पुस्तकाचे मंगळवारी प्रकाशन (फोटो विजय बहादुरे फोल्डरमध्ये)
छत्रपती संभाजीनगर : दिवंगत डॉ. संभाजी खराट लिखीत वैधव्याची समस्या आणि मुक्तीची दिशा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी २७ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. एमजीएम विद्यापीठातील आर्यभट्ट हॉलमध्ये हा सोहळा होत असून या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सत्यशोधक डॉ. संभाजी खराट मित्रमंडळ, ग्रंथाली प्रकाशन आणि सर्व परिवर्तनवादी संघटना यांच्या वतीने हा पुस्तक प्रकाश सोहळा आयोजित केला आहे. यावेळी ज्येष्ठ विचारवंत व एमजीएम विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर आणि एमजीएम विद्यापीठाच्या स्त्री व लिंगभाव अभ्यास आंतरविद्या अभ्यास शाखा विभागातील प्रा.डॉ. मंजुश्री लांडगे या पुस्तकावर भाष्य आणि मांडणी करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक विचारवंत प्रा. सुदाम चिंचाणे यांची उपस्थिती राहणार आहे. प्रकाशन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वर्षा संभाजी खराट, कॉ. एस.बी. टाकळखेडे, प्रा. प्रभाकर गायकवाड यांनी केले आहे.