मान्सूनपूर्व पाऊसातच कन्नडचे बस स्थानक खड्यांच्या विळख्यात.स्थानिक प्रशासन मात्र ढिम्म
कन्नड /प्रतिनिधी/ मान्सूनपूर्व पावसाचा तडखा बसताच कन्नड बस स्थानक पूर्णतः खड्ड्यात गेले आहे.
आमचे प्रतिनिधी रोजी सदर स्थानकात सकाळी फेरफटका मारला असता प्रवाशांच्या सोयीसाठी असणाऱ्या बस स्थानकात नको इतके खड्डे पडले असुन प्रवाशांना गाडी पकडतांना मोठी कसरत करावी लगत आहे.
सदर बस स्थानकात मोठ्या प्रमाणात मोठ मोठी खड्डे पडली असुन त्यात पाऊसाचे पाणी साचले आहे.त्यातून प्रवाशांना मार्ग काढतांना मोठी कसरत करावी लगत आहे.त्यातच स्थानकात बहुतांशी ठिकाणी कचऱ्यांचे ठिग सुद्धा साचले असुन स्थानक दुर्गंधीने व्यापले आहे.सदर ठिकाणी मोकाट प्राण्यांचाही मोठ्या प्रमाणात सुळसुळाट दिसून आला.सदर स्थानकाच्या आस्थापना विभागाकडुन याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून ते अत्यंत घातक