विवाहित महिला मुलीसह बेपत्ता
कन्नड /प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील नादरपुर येथील एक विवाहिता तिच्या दोन वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची तक्रार विवाहितेच्या पतीने पिशोर पोलिस ठाण्यात दाखल केली. काजल भरत काथार (वय २७) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. याविषयी दाखल तक्रारीचा आशय असा: तक्रारदार भरत काथार हे नेहमीप्रमाणे गुरूवारी (दि.१४) शेतात कामाला गेले होते. संध्याकाळी घरी आल्यानंतर पत्नी काजल व मुलगी जान्हवी (वय २) हे दोघे घरात दिसून न आल्याने त्यांनी त्यांच्या नऊ वर्षीय मुलाकडे विचारपूस केली असता त्याची आई मूलीला घेऊन एका दुचाकीवर कोठेतरी गेल्याची माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत विवाहिता व मुलगी घरी न आल्याने दुसऱ्या दिवशी सगळीकडे शोध घेतला परंतु दोघे कोठेही आढळून न आल्याने भरत काथार यांनी पिशोर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. बेपत्ता विवाहितेची उंची साडेपाच फूट,माध्यम बांधा, रंग सावळा, गोल चेहरा, अंगात गुलाबी ड्रेस अशा वर्णनाची महिला कोणाला आढळल्यास पिशोर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
