किरकोळ विक्रेत्यांकडे सुध्दा स्मार्ट पेमेंटची सुविधा
सुट्या पैशांच्या जाचातून ग्राहकांची झाले सुटका
सर्वत्र डिजिटल पेमेंट इको
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/प्रतिनिधी /सिस्टिममुळे आपल्या दैनंदिन जगण्यातील व्यवहाराची पद्धत बदलत चालली आहे. आत्ता शहराप्रमाणेच तालुक्याच्या ग्रामीण भागातील चहा, किराणा दुकान, भाजीपाला, भंगारवाला, फळं विक्रेता , पाणी पुरी – भेळ, चायनीज कॉर्नर, इतर व्यवसाय किंवा मोठ्या शोरूम मध्येही ‘युपीआय’द्वारे ऑनलाइन व्यवहार होत असल्याचे पहावयास मिळते आहे. त्यामुळे डिजिटल इंडियात शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही स्मार्ट पेमेंटला प्राधान्य दिले जात आहे. तर, किरकोळ व्यावसायिकांची व ग्राहकांची सुट्या पैशाच्या कटकटीतून सुटका झाली आहे.
व्यवहारातील एक रुपयांपासून हजारो रुपयांचे व्यवहार स्मार्ट पेमेंटद्वारे कॅशलेस करत आहेत. त्यामुळे घरात किंवा खिशात
प्रत्येक ठिकाणी ऑनलाइनला प्राधान्य
डिजिटल इंडियात शहराबरोबर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सुविधांना प्राधान्य दिले जात आहे. शहरातील मोठमोठ्या शोरूमबरोबर पाणीपुरीसह इतर किरकोळ व्यावसायिकांकडे सुद्धा डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा आहे. आता तर, ग्रामीण भागातही ऑनलाईन व्यवहार करण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे खिशात रक्कम असो अथवा नसो, व्यवहार मात्र, वेळेत पूर्ण होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
देखील रोख रक्कम ठेवणे नागरिक टाळत असल्याचे दिसून येत आहे. शहरासह ग्रामीण परिसरात सुट्या पैशांचे टेन्शन मिटली आहे. छोट्या विक्रेत्यांकडेही स्मार्ट पेमेंटची सुविधा उपलब्ध झाली आहे. ग्रामीण भागात आधारकार्डवरून बँकेतील पैसे काढून दिले जातात. परंतु, घरात मोबाइल सुविधा असल्याने वीज मीटरचे बिल, टेलिफोन बिल, ट्रॅव्हल कंपन्यांचे, विमानाचे, रेल्वेचे तिकीट, सिलिंडरची रक्कमदेखील ऑनलाइन व्यवहारांद्वारे स्वीकारण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर ग्रामीण परिसरातील चहा, भेळ सेंटर, किराणा दुकान, भाजीपाला, भंगारवाला, चायनीज कॉर्नर, इतर व्यवसायांसाठी वापर वाढला आहे. परिणामी, सुट्या पैशांचे टेन्शन मिटली
असल्याचे चित्र दिसून येत आहे. ऑनलाइन खरेदी विक्री वाढली असून या व्यवहारातही कॅशलेस व्यवहार केला जात आहे. ऑनलाईनद्वारे एखादी वस्तु प्राप्त झाल्यानंतर त्याचे पेमेंट ऑनलाइन अदा केले जात आहे.