‘विकसित कृषी संकल्प यात्रा’
शेतकऱ्यांमध्ये कृषी तंत्रज्ञानाची जनजागृती करणार
छत्रपती संभाजीनगर – शेतकऱ्यांमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची जनजागृती करण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीला चालना देण्यासाठी जिल्ह्यात दि. 22 मे 2024 पासून ‘विकसित कृषी संकल्प यात्रा’ होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री मा. श्री. शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा 12 जून 2024 पर्यंत जिल्ह्यात विविध ठिकाणी पोहोचणार आहे.
खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या यात्रेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांपर्यंत नवीन कृषी तंत्रज्ञान पोहोचवणे, त्याचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे, तसेच शासनाच्या विविध योजनांबद्दल माहिती देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. या मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड आणि सोयगाव या तालुक्यांमधील एकूण 10 गावांमध्ये विविध कृषी विस्तार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या यात्रेतून शेतकरी, कृषी अधिकारी आणि शास्त्रज्ञ यांच्यात थेट संवाद साधला जाणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे शक्य होईल. या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाने कृषी विभाग, महसूल विभाग, ग्राम विकास अधिकारी आणि स्थानिक कर्मचारी यांच्यासह संबंधित विभागांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती मिळून त्यांना समृद्धीकडे वाटचाल करण्यास मदत होईल.
29 मे रोजी फुलंब्री आणि छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील चौका ,गणोरी, किनगाव, वारेगाव ,विटेकर वाडी बिल्डा तसेच 30 मे रोजी कुंभेफळ, भांबरडा, दुधड, मुरूमखेडा, पिंपळखुंटा, लाड सावांगी या गावांमध्ये विकसित कृषी संकल्प यात्रा होणार आहे. 31 मे रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील टोणगाव, हिवरा, जडगाव जडगाव -दोन, पिंपरी राजा ,आडगाव, येथे जाणार आहे. 1 जून रोजी सय्यदपूर, औरंगपुरा, ढासला ,ढवळापुरी कासनापूर, फेरन जळगाव तर 3 जून रोजी शेलुद ,चारठा, हातमाळी, नायगव्हाण, लामकना, अंजनडोह या गावांमध्ये ही यात्रा जाणार आहे. 3 जून रोजी पैठण तालुक्यातील आडुळ, राजापूर, देवगाव, दाभरूळ, अंतरवाली, एकतुनी, तर 4 जून रोजी बिडकीन, शेकटा, तोंडोळी लोहगाव खुर्द, लोहगाव बुद्रुक मुलानी वडगाव तसेच 5 जून रोजी ढोरकिन ,कारकीन टाकळी, पैठण, धनगाव इसारवाडी, वाहेगाव आणि 6 जून रोजी पांगरा ,निलजगाव, पोरगाव ,लाखेगाव, पाडळी, खेर्डा या ठिकाणी ही यात्रा जाईल. 7 जून रोजी तालुका फुलंब्री मध्ये पिंपळगाव देव, पिंपळगाव वळण, आडगाव, सांजूळ, डोंगरगाव शिव ,शिरोडी खुर्द ,8 जून रोजी पाल, पार्थी, डोंगरगाव कवाड, पीरबावडा गिरसावळी, मारसावळी बाबुळगाव तसेच 9 जूनला फुलंब्री तालुक्यातील बाबरा, वाहेगाव, निधोना, चिंचोली नकिब, कान्हेगाव, चिंचोली हिवरा तसेच 10 जून रोजी सिल्लोड तालुक्यातील अन्वी, बनकिन्होळा, निल्लोड, गेवराई सेमी, भवन केऱ्हाळा, पळशी या ठिकाणी ही यात्रा जाणार आहे 11 जून रोजी सिल्लोड तालुक्यातील अन्वी, रहिमाबाद, आसाडी, सारोळा, पानवडद, पांगरी या ठिकाणी असणारा असून 12 जून रोजी सोयगाव तालुक्यातील फर्दापूर, वरखेडी बुद्रुक, जामठी, पिंपळा, जवळा, व रवळा या गावांमध्ये ही विकसित कृषी संकल्प यात्रा जाणार आहे. या यात्रेत शेतकऱ्यांनी सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.
