शेतीच्या व्यवहरातुन फसवणूक केल्या प्रकरणाी तालुका पोलीस स्टेशन येथे 420 चा गुन्हा दाखल
जालना/प्रतिनीधी / शेतीच्या व्यवहारातुन शेख जमीलूद्दीन शेख अमिरुद्दीन यांच्या फिर्यादीरुन तालुका जालना पोलीस स्टेशन येथे 420, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, आरोपी विरजी जस्सा वागडीया, प्रदिप शरद पाटिल, विश्वास नागनाथराव भोर, नलीणी शरद पाटिल, नंदकिशोर तुकाराम गव्हाणे यांच्या कडुन मौजे इंदेवाडी जालना शिवारातील येथील शेत गट नं 74 मधिल एक हेक्टर 43 आर शेत जमीन खकम दोन कोटि पंचवीस लाख रूपया मध्ये विक्री करण्याचा करार दि. 17/12/2022 रोजी केला आणी आमच्या कडुन इसार रक्कम 56,25,000/- घेवुन आमच्या हक्कात विक्रीचा करारनामा / ईसार पावती अँड आर. बी मोरे जालना यांच्या समक्ष दि. 17/12/2022 रोजी वेळ दुपारी 03.00 वा सुमारास ईसार पावती करून रक्कम स्विकारली तेव्हा विक्री जमीनी संबंधी महसुल मंत्री मंत्रालय मुंबई येथे प्रकरण प्रलंबित असल्याचे त्यांनी आम्हाला सांगीतले आणी सदर प्रकरणाचा निकाल स्वतः च्या बाजुने लावुन घेण्याची जबाबदारी त्यांची असल्याचे देखील त्यांनी आम्हाला सांगीतले सदरचे प्रकरण अद्यापही मा. महसुल मंत्री मंत्रालय मुंबई येथे प्रलंबित आहे आणी हि बाबत त्यांना माहिती आहे तरी देखील आमची आर्थिक लुबाडणुक व फसवणुक करण्याच्या दृष्ट हेतुने त्यांनी दि 29/05/2024 रोजी आम्हाला कोणतीही माहिती न देता अंधारात ठेवुन बनावट कागदपत्राच्या आधारे सदरची शेत जमीन सौ संगीता अशोक अग्रवाल, राहुल किशोर अग्रवाल, सौ निकीता राहुल अग्रवाल, आशोक सुरजमल अग्रवाल यांच्या नावाने विक्री पत्र 2427/2024-2428/2024-2023/2024-2029/2024 अन्वये नोंदवुन दिली व अर्थिक लुबाडणुक व फसवणुक केली आहे.
फसवणुक केल्या प्रकरणी 1) विरजी जस्सा वागडीया रा. संभाजी नगर जालना 2) प्रदिप शरदराव पाटिल रा. छ. संभाजी नगर 3) विश्वास नागनाथराव भोरे रा. भाग्यनगर जालना 4) नलीणी शरद पाटिल रा. छ. संभाजी नगर 5) नंदकिशोर तुकाराम गव्हाणे रा. घनसावंगी जालना यांच्या वर तालुका पोलीस स्टेशन जालना येथे भादवी कलम 420 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढिल तपास पोलीस निरीक्षक उनवणे हे करीत आहेत.
