मनपाच्या शेजारीच असलेल्या बन्शीलाल नगर येथे प्रचंड अस्वच्छता, नागरिकांमधून मनपा विरोधात संताप
जालना /प्रतिनीधी / जालना शहर महानगरपालिका हद्दीमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पाहायला मिळत असून महानगरपालिका कार्यालयाच्या बाजूलाच असलेल्या बन्सीलाल नगर येथे सुद्धा प्रचंड अस्वच्छता पसरली असल्याने येथील नागरिकांनी महानगरपालिका विरोधात संताप व्यक्त केला. जालना नगरपरिषद असताना ही तीच गत होती. आणि आता महानगरपालिका झाली तरी सुद्धा तीच गत असल्याने जालन्याला ग्रामपंचायतच करायला पाहिजे असाही संतप्त सवाल येथील नागरिकांनी केला. अस्वच्छतेमुळे डास मच्छर यांची उत्पत्ती वाढत असून रोगराई पसरण्याची भीती नागरिकांना सतावत आहे. म्हणून महानगरपालिकेच्या आयुक्तांनी परिसरामध्ये धूर फवारणी सारखे उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांच्या वतीने होत आहे.
आज दि. 19 सोमवार रोजी सकाळी अकरा वा. च्या दरम्यान बन्सीलाल नगर येथील रहिवासी प्राध्यापक डॉक्टर शाम जवळेकर यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना म्हणाले की जालना शहराला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ऐतिहासिक वारसा आहे. परंतु लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे या लोकांनी शहराचे वाटोळे केले असल्याचे ते म्हणाले.