नाचनवेल बाबरा रोडवर अपघातात विठ्ठल घुले ठार
कन्नड /प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील नाचनवेल ते बाबरा रोडवर रविवारी दि १८ रोजी रात्री पिकप आणि मोटर सायकल  यांच्यात समोरासमोर धडक झाली.
 यात मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला तर पिकप रस्त्याच्या बाजूला शेतात जाऊन पलटी झाले.
याबाबत माहिती अशी की बरकतपुर येथील विठ्ठल किसन घुले वय ३६ हे संभाजीनगर कडे आपल्या मोटरसायकल वरून जात असताना नाचनवेल बाबरा रोडवर डोंगरगाव शिवारात समोरासमोर धडक बसल्याने विठ्ठल घुले हे जागीच ठार झाले.
 तर पिकप गाडी रस्त्याच्या बाजूला शेतात जाऊन पलटी झाली पिकप चालक हा वाहन सोडून पसार झाला डोंगरगाव येथील ग्रामस्थांनी अपघातग्रस्त व्यक्तीच्या खिशातील आधार कार्ड बघून नातेवाईकांशी संपर्क साधला नातेवाईकांनी त्यास पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
नाचनवेल ते फुलंब्री हा रस्ता अतिशय वळणावळणाचा व अरुंद आहे.
याबाबत पिशोर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.