Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादयांत्रीकरणामुळे शेती महागली ट्रॅक्टर मशागतीचे दर आता लग्नाला

यांत्रीकरणामुळे शेती महागली ट्रॅक्टर मशागतीचे दर आता लग्नाला

यांत्रीकरणामुळे शेती महागली ट्रॅक्टर मशागतीचे दर आता लग्नाला

कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील काही भागात आठवड्यात अवकाळी पाऊस कोसळला. त्यामुळे शेतजमिनीत ओलावा निर्माण झाल्याने तालुक्यातील शेतकरी शेत नांगरणीची कामे करताना दिसून येत आहेत. मात्र, डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टरचे भाव एकरी सतराशे रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. खरीप व रब्बी पीक निघाल्यावर शेतकरी शेतजमीन नांगरणी करून ठेवत असतो मागिल आठवड्यात अवकाळी पाऊस बरसला. या अवकाळी पावसामुळे शेतजमिनीत योग्य ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे नांगरणी केली जात आहे. सध्या शेतातील कामे सर्रास ट्रॅक्टरने केली जात आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांना गावात रोजगार उपलब्ध होऊन चार पैसे पदरी पडताना दिसून येत आहेत. रब्बी हंगाम संपल्यावर शेतातील पाऱ्या, धुऱ्याची दुरुस्ती करीत असतात.
सकाळच्या सुमारास शेतशिवारात ट्रॅक्टरचे सूर कानी पडत आहेत. मात्र डिझेलच्या दरवाढीने ट्रॅक्टरने नांगरणी करणे अनेक शेतकऱ्यांच्या अवाक्याबाहेर झाले आहे. नगरणीचा प्रति एक्कर सतरासे रुपये एकर द्यावे लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. नांगरणीचे दर वाढल्याने काही शेतकरी बैलजोडीच्या साहाय्याने कामे करीत आहेत. तर काही शेतकरी कापूस पिकाची लागवड केलेल्या शेत जमिनीची साफसफाई करून नांगरणी योग्य शेतजमीन तयार करताना दिसून येत आहेत. यांत्रिकीकरणामुळे शेती महागली असा सुर शेतकऱ्यांनमंधून उमटत आहे.
शेतीच्या एकूण उत्पादनाच्या जवळपास ८० टक्के खर्च होते. जेमतेम २० टक्के नफा मिळते. त्यातही उत्पादनात घट झाल्यास मोठा फटका संबंधित शेतकऱ्याला सहन करावा लागतो. शेतीतील यांत्रिकीकरणामुळे उत्पादन खर्च भमसाठ वाढला आहे. असे शेतकरी म्हणत आहे
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments