Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादनिवृत्तीवेतनधारकांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या संदेशास बळी पडू नये

निवृत्तीवेतनधारकांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या संदेशास बळी पडू नये

निवृत्तीवेतनधारकांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या संदेशास बळी पडू नये

जालना :- निवृत्तीवेतन सुरु करणे, निवृत्तीवेतन बंद करणे, निवृत्तीवेतन फरक अदा करणे अथवा अतिरिक्त रक्कम वसूल करण्याच्या अनुषंगाने राज्यातील कोषागार कार्यालयामार्फत फोनद्वारे/मोबाईलद्वारे निवृत्तीवेतनधारकांना कळविले जात नाही. तसेच व्हॉट्ॲपद्वारे अथवा इतर सोशल मिडियावरुन निवृत्तीवेतन बंद होऊ नये, याकरिता लिंक ओपन करुन फॉर्म भरण्याबाबतही कळविले जात नाही. तसेच कोषागार कार्यालयामार्फत कोणत्याही कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकाच्या घरी पाठविले जात नाही. कोषागारमार्फत करण्यात येणाऱ्या सर्व व्यवहारांकरीता पत्रव्यवहार केल्या जातो. सर्व निवृत्तीवेतनधारकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी फोन पे/गुगल पे/ ऑनलाईन रक्कम भरण्याचा अथवा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या संदेशास बळी पडू नये. अशा प्रकारे दुरध्वनीद्वारे /मोबाईलद्वारे संदेश प्राप्त झाल्यास जिल्हा कोषागार कार्यालयाशी तातडीने संपर्क साधाण्याचे आवाहन कोषागार अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments