स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदार याद्या बनवताना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सतर्क रहावे!
जालना जिल्हा उपाध्यक्ष
आम आदमी पार्टी मार्फत जालना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यात घेण्याचे सन्माननीय न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. त्यानुसार मतदार याद्यांचे काम आता करावे लागणार हे काम करत असताना अतिशय सतर्क राहावे यासाठी आम आदमी पार्टी मार्फत जालना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना एक पत्र माननीय तहसीलदार तथा तालुका निवडणूक अधिकारी भोकरदन यांच्या मार्फत देण्यात आलेले असल्याचे बोरसे गुरुजींनी कळविले आहे
निवेदनात पुढे म्हटले आहे की, जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील अनेक मतदार याद्यांच्या मध्ये असे आढळून येते की,मतदार प्रत्यक्ष वेगळ्या ठिकाणी व वार्डात राहतात, त्यांचे नाव दुसऱ्याच वार्डाच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट होते. तसेच एकाच व्यक्तीचे नांव अनेक ठिकाणी मतदार यादी मध्ये समाविष्ट असते. या गोष्टी सहज होत नसून काही राजकीय लोकांच्या व राजकीय पक्षांच्या हस्तक्षेपाने निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांशी संगणमत करून या गोष्टी घडून येतात. त्यामुळे स्पष्टपणे कर्मचाऱ्यावर योग्य ती जबाबदारी टाकून जो मतदार ज्या वार्डामध्ये राहतो त्याच वार्डाच्या यादीमध्ये त्याचे नांव समाविष्ट करण्यात यावे तसेच एकाच मतदाराचे नांव अनेक ठिकाणी समाविष्ट होऊ नये तसेच बोगस नांवे मतदार यादीमध्ये समाविस्ट होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. सहकार्याची अपेक्षा व्यक्त करून केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्याबाबत पार्टी मार्फत विनंती करण्यात आलेली आहे
अन्यथा आम आदमी पार्टी आंदोलनात्मक पवित्रा घेईल असा इशाराही पत्रामध्ये देण्यात आलेला आहे. यावेळी सोळंके पाटिल महजाद खान,फारुखभाई,नाडे साहेब आणि पार्टिचे कार्यकर्ते हजर होते. असे बोरसे गुरुजींनी कळवीले आहे.
– बोरशे गुरुजीं