भाजपाच्या जालना महानगर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी श्री.भास्कर आबा दानवे यांची निवड होताच फटाके फोडून जल्लोष
चांगले काम करण्याचा व सर्वांना सोबत घेऊन संघटन अधिक मजबूत करण्याचा माझा प्रयत्न
– नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.भास्कर आबा दानवे
जालना /प्रतिनिधी/ भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्षपदांची घोषणा पक्षाचे निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी नुकतीच केली आहे. भाजपाचे जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे यांच्या खांद्यावर जालना महानगर जिल्ह्याची धुरा सोपवण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, भाजपा कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले व माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे, आ.नारायण कुचे, आ.संतोष पाटील दानवे यांनी अभिनंदन केले आहे.
पक्षाच्या निरीक्षकांनी नुकतीच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आणि त्यामध्ये जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यापैकी प्रत्येक उमेदवाराला पसंती क्रमानुसार मते देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. भास्कर आबा दानवे यांचा प्रदीर्घ संघर्ष लक्षात घेता हे महत्त्वाचे पद ठरणार आहे. हि निवड पक्षामार्फत जाहीर होताच भाजपा जालना महानगराच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.
भास्कर आबा दानवे यांनी माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तसेच जालना विधानसभा प्रमुख म्हणून काम पाहिले आहे व चांगले काम करून दाखवले. या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करूनच त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे मानले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वाची मानली जाते.
पक्षाने माझ्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी पार पाडणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष म्हणून चांगले काम करण्याचा व सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी मा.जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, मा.जिल्हाध्यक्ष सतीश जाधव, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सोपान पेंढारकर, उद्योजक अर्जुन गेही, सिद्धिविनायक मुळे, राजेंद्र भोसले, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलीये, मंडळ अध्यक्ष अमोल धानुरे, विष्णू डोंगरे, शशिकांत घुगे, अमोल करंजेकर, वसंत शिंदे, राजेश जोशी, सुभाष सले, सुमित सुरडकर, नागेश अंभोरे, प्रतीक पोहेकर, गोविंद ढेम्बरे, संतोष खंडेलवाल, कृष्णा गायके, निळकंठ कुलकर्णी, दत्ता जाधव, गणेश वाघमारे, विकास कदम, निलेश गवळी, कृष्णा शिंदे, राजेंद्र जगताप, शिवाजी शिंदे, शाम उगले, सतीश जारे, सुनील अंभोरे, तुळशीदास अंभोरे, आयुष अंभोरे, गोरक्षनाथ गायकवाड, अनिल वरगणे, विशाल वरगणे, भगवान वरगणे, राजू वरगणे, विराट नामदे, योगेश विधाते, गौरव गोधेकर आदींची उपस्थिती होती
