सिल्लोड तालुक्यातील बोरगांव सारवाणी व सावखेडा अवैध वाळू उपसा जोरात
महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने घेतले झोपेचे सोंग.
आत्ताच एक्सप्रेस
सिल्लोड /प्रतिनिधी /
सिल्लोड तालुक्यातील सावखेडा,बोरगाव बाजार, देऊळगाव बाजार,कोटनांद्रा वाडी आदी गावातील पूर्णा,चारणा, नदीपात्रातून दिवस रात्र अवैध वाळू वाहतूक उपसा करण्यासाठी एका महीन्याचा परवाना लागत असेल तर एक लाख दहा हजार रुपये भरा आणि महिनाभर बिनधास्त दिवस रात्र अवैध वाळू वाहतूक करा असा फतवा तालुका पातळीवरील लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काढला आहे यात सविस्तर विभाजन पुढील प्रमाणे गावपातळीवर दररोज प्रत्येक ब्रास वाळूचे एक हजार रुपये, व महसुल गावपातळी वर दोन हजार रुपये प्रत्येक ब्रास , तालुका महसुल व पोलीस वरिष्ठ अधिकारी चाळीस हजार रुपये महीना याप्रमाणे हप्ते देऊन अवैध वाळू उपसा मोठ्या जोशात चालवला जातो तर यात एखादा पत्रकार,सुज्ञ नागरिक किंवा शेतकरी यांनी काही अवैध वाळू उपसा विषयी हरकत घेतली तर त्याला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गावगुंडा कडून शिवीगाळ मारहाण किंवा जिवे मारण्याची धमकी दिली जाते याप्रमाणे अवैध वाळू वाहतूक विरुद्ध आवाज उठवणार्याचा आवाज बंद करण्यात येतो,या अवैध वाळू चोरामध्ये हि हिंमत येते कूठुन याला महसुल व पोलीस विभागाचे पाठबळ असावे असे नागरिकात खुलेआम बोलले जात आहे.
तरी वरिष्ठ महसुल व पोलीस अधिकारी आपल्या पदाची व इमानाची लाज राखत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वर योग्य ती कार्यवाई करावी व जनतेत महसुल व पोलीस विभागाची मलीन झालेली इमेज पुन्हा विश्वास पात्र करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.