येत्या काही महिन्यात फुलंब्री चा देवगिरी सहकारी साखर सुरु होईल, आमदार अनुराधा चव्हाण
फुलंब्री/प्रतिनिधी/फुलंब्री येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना अवसायनातून बाहेर काढण्यात येऊन यंदाच्या हंगामात गाळप सुरु करण्यात येईल. याकरीता कारखान्यावर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. १४ वर्षांचा वनवास संपवून येत्या हंगामात कारखान्याचा भोंगा वाजणार आहे. यातून गेल्या विधानसभा निवडणूकीत दिलेले आश्वासनाची पुर्तता करण्यात येत असल्याची माहिती आमदार अनुराधा
चव्हाण आणि अतुल चव्हाण यांनी फुलंब्री येथे शनिवारी (दि.१०) शनिवारी आयोजित पत्रकार परिषेदेत दिली.
आ. चव्हाण म्हणाल्या की, देवगिरी सहकारी साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम १९९२-९३ मध्ये सुरु झाला. काही काळ कारखाना सुरळीत चालला मात्र कालांतराने तो डबघाईस आला. सन २०१०-११ मध्ये म्हणजेच १४ वर्षापुर्वी शेवटचा गळीत हंगाम झाला. त्यानंतर घरघर लागून कारखाना
कारखान्यावर तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती
कारखाना साखर आयुक्तांनी पुनर्रचीत कारखान्याचे काम पाहण्यासाठी नियमित व्यवस्थापन समितीची निवड होईपर्यंत शासन मान्यतेनुसार अशासकीय सदस्य म्हणून तात्पुरत्या व्यवस्थापन समितीची निवड केली आहे. या समितीवर कल्याण भिकाजी चव्हाण, नितीन (बंटी) शंकरराव देशमुख आणि योगेश मधुकर मिसाळ यांची एक वर्षाच्या कालावधीसाठअशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.
फुलंब्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत देवगिरी साखर कारखाना सुरू करण्याबाबत माहिती देताना आ. अनुराधा चव्हाण, अतुल चव्हाण आदी.
कर्जाच्या खाईत बुडाला. कारखान्याच्या मालकीची सावंगी येथे १५५ एकर जमीन होती त्यातली २३ एकर जमीन समृद्धी महामार्गात गेल्याने कारखान्याला २७कोटी रुपये मिळाले. त्यानंतर चौका घाटातील ४२ एकर जमीन विक्रीतून ७ कोटी ४० लाख, सावंगी शिवारातील १३२ एकर जमीन विक्रीतुन ८४ कोटी रुपये मिळाले. ही जमीन विक्री करुन एकूण १२४ कोटी ६५ लाख रुपये
कारखान्यास मिळाले. यातून सर्व कर्ज देणी करुन १३ कोटी ३९ लाख रुपये शिल्लक
आहेत. या रकमेतुन यंदाच्या हंगामात कारखाना सुरु करून परीसरातील ऊस खरेदी केला जाणार, तालुका व कारखाना कार्यक्षेत्रातील नविन सभासद नोंदणी (शेअर्स) करण्यात येणार असल्याची माहितीही आ. अनुराधा चव्हाण आणि त्यांचे पती अतुल चव्हाण यांनी या पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेस यांची होती उपस्थिती
शिवाजी पाथ्रीकर, नवनिर्वाचीत अशासकीय सदस्य कल्याण चव्हाण, नितीन देशमुख, योगेश मिसाळ, अवसायक श्रीराम सोन्ने, पंडीतराव जाधव, राहुल डकले, संतोष तांदळे, सुचित बोरसे, कैलास सोनवणे, सर्जेराव मेटे, जे.पी.शेजवळ, बाबासाहेब तांदळे