Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबाद लहाण्याचीवाडी येथील योगेश बहादुरे यांना पीएच डी प्रदान 

 लहाण्याचीवाडी येथील योगेश बहादुरे यांना पीएच डी प्रदान 

 लहाण्याचीवाडी येथील योगेश बहादुरे यांना पीएच डी प्रदान 
फुलंब्री/प्रतिनिधी/औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने फुलंब्री तालुक्यातील लहाण्याचीवाडी- येथील रहिवासी असलेले योगेश पुंजाराम बहादुरे यांना इतिहास विषयात पीएच-डी पदवी जाहीर करण्यात आली आहे. डॉ. सय्यदा रिझवाना तबस्सुम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘मराठा अँड राजपूत रिलेशन अ क्रिटिकल स्टडी’ (1660-1765) या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांच्या यशाबद्दल  विभागप्रमुख डॉ. गीतांजली बोराडे डॉ. पुष्पा गायकवाड डॉ. बीना सेंगर, डॉ. विठ्ठल घुले डॉ. श्याम सिरसाट, डॉ. केशव लहाने, डॉ. राजेंद्र दाते पाटील डॉ. निलेश अंबेवाडीकर,  डॉ. पंजाबराव पडूळ, डॉ. सचिन बोराडे,  राजेश मुंढे, डॉ. कामजी डक, प्रा. विजय पांडे, भगवान गाडेकर, तुकाराम बहादुरे प्रा. बाबासाहेब लहाने, प्रवीण चिंतोरे, पुजा बहादुरे-आढाव, अर्चना वाटोडे, उमेश अंडील, कृष्णा खरात, प्रा. ऋषिकेश लहाने राहुल यादव,किशोर बांबर्डे, रमेश बहादुरे,समाधान लहाने हनुमान मोरे, अविनाश सावंत, योगेश लहाने आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments