Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादकन्नड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

कन्नड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

कन्नड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

कन्नड/ प्रतिनिधी/ कन्नड शहरातील नगरपालिका प्रशासनाचे अपयश आता ठळकपणे समोर आले असून, नागरिकांसाठी ही परिस्थिती मोठ्या अडचणीची ठरत आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून कचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडल्याने नागरिकांचे जीवन अक्षरशःविस्कळीत झाले असून, नागरिक प्रचंड संतप्त आहेत.कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून पगार मिळालेला नसल्याने त्यांनी काम बंद केले आहे. त्यांनी कचरा उचलण्याचे काम थांबवले आहे. त्यामुळे शहरभर अनेक कचऱ्याचे ढिग वाढले असून, घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या परिस्थितीमुळे डास, उंदीर, माशा यांची संख्या वाढली असून, साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.दुसरीकडे, पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प असल्याने नागरिकांना दहा-दहा दिवस पाण्याच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे. उन्हाळ्याच्या झळांमध्ये पाण्यासाठी होणारी ही वणवण आरोग्यदृष्ट्या अत्यंत गंभीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही याकडे कोणतेही लक्ष दिले जात नसल्याची भावना व्यक्त होत आहे. शहरातील विविध सामाजिक संघटनांनी यासंदर्भात तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक आहे. अन्यथा संतप्त नागरिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार असल्याची माहिती संतोष नामदेव पवार प्रमुख नगरसेवक कवडे काका प्रदीप बोडके संदीप भोगले  सोमीनाथ दाभाडे श्रीराम घुगे यांनी निवेदन दिले

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments