Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादनाथसागर जायकवाडी जलाशय, नाथ मंदिर व पैठण शहरामध्ये दशहतवाद हल्ला प्रसंगाच्या अनुषंगाने...

नाथसागर जायकवाडी जलाशय, नाथ मंदिर व पैठण शहरामध्ये दशहतवाद हल्ला प्रसंगाच्या अनुषंगाने पोलीसांची मॉक ड्रिल

नाथसागर जायकवाडी जलाशय, नाथ मंदिर व पैठण शहरामध्ये दशहतवाद हल्ला प्रसंगाच्या अनुषंगाने पोलीसांची मॉक ड्रिल
पैठण/ प्रतिनिधी/महाराष्ट्र राज्य व देशभरामध्ये दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी करावयाच्या कारवाई व उपाय योजनेच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. विनयकुमार राठोड, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १०/०५/२०२५ रोजी दुपारी ०४.०० ते सांयकाळी ०७.०० वाजे दरम्यान पोलीस स्टेशन पैठण अंतर्गत जायकवाडी नाथसागर जलाशय, नाथ मंदिर व पैठण शहरामध्ये पोलीसांची मॉक ड्रिल घेवुन नागरिकांनाच्या बचावचे व दशहतवादी हल्ला परतावुन लावण्याचे प्रात्याक्षिक करण्यात आले. सदर प्रात्याक्षिक दरम्यान पैठण शहरामध्ये विविध ठिकाणी पोलीसांनी नाकाबंदी लावुन नाथ मंदिर व नाथसागर जलाशय परिसरामध्ये अतिरिक्त पोलीस सुरक्षा तैनात करुन सदर पसिरामध्ये असलेले पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवून संशयित ईसमास ताब्यात घेवुन दहशतवादी कारवाया रोखण्याचे प्रात्याक्षिक करुन दशहतवादी कृत्यांच्या घटनांबाबत जनमानसात जनजागृती निर्माण व्हावी व नागरिकांना अशा आणिबाणीच्या प्रसंगी जागरुक, सजग, सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले.
सदर मॉक ड्रिल करिता उपविभागीय पोलीस अधिकारी पैठण श्री. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, सहायक पोलीस निरीक्षक निलेश शेळके हे आणि दहशतवाद विरोध पथकाचे पोलीस निरीक्षक शिनगारे, दशहत वाद विरोधी शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ठाकरे, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे पोलीस उप निरीक्षक ढाकणे, जिल्हा विशेष शाखा पथकाचे पोलीस निरीक्षक हातमोडे, सहायक पोलीस निरीक्षक गिते, आणि श्वान पथक, स्थानिक गुन्हे शाखा पथक, जलद प्रतिसाद पथक, दंगा काबु पथक, पोलीस ड्रोन पथकाचे अधिकारी व अंमलदार आणि पोलीस स्टेशन पैठण व उपविभाग पैठण येथील अधिकारी व अंमलदार असे एकुण १४ पोलीस अधिकारी व १०२ पोलीस अंमलदार हजर होते. तसेच शासकीय रुग्णालय पैठण येथील मदत कार्य पथक, नाथसागर जलाशय येथील सुरक्षा व मदत पथक, नगर परिषद पैठण येथील अग्निशामक दल पथक असे मनुष्यबळ वापरण्यात आले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments