Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादजवखेडा खुर्द शिवारातील शेतरस्ता पोलिस बंदोबस्तात केला मोकळा 

जवखेडा खुर्द शिवारातील शेतरस्ता पोलिस बंदोबस्तात केला मोकळा 

जवखेडा खुर्द शिवारातील शेतरस्ता पोलिस बंदोबस्तात केला मोकळा 

आत्ताच एक्सप्रेस
नाचनवेल/प्रतिनिधी / कन्नड तालुक्यातील तालुक्यातील जवखेडा खुर्द येथे शेतकऱ्यांच्या दोन गटातील वादामुळे बंद पडलेला शेतरस्ता अखेर तहसिलदारांच्या आदेशाने पोलिस बंदोबस्तात मंगळवारी सांयकाळी मोकळा करण्यात आला.कन्नडचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या आदेशाने नायब तहसीलदार दिलीप सोनवणे,शैलेश राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी जवखेडा खुर्द शिवारातील गट क्रमांक ८२ व ९६ मधील नाल्यावर झालेले अतिक्रमण काढून देण्यासाठी मंडळ अधिकारी विकास वाघ व ग्राम महसूल अधिकारी सीमा राजळे गेले असता शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे नाल्याच्या बाजूने रस्ता काढून देण्याचा तोडगा निघाला. मात्र काही नागरीकांनी मंडळ अधिकाऱ्यांसोबत वाद घालत अतिक्रमण काढण्यास विरोध केला तसेच जेसीबीसमोर आडवे झोपून काम सुरू करण्यात अडथळा आणला. त्यामुळे मंडळ अधिकारी विकास वाघ यांनी शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांविरुध्द पिशोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर सांयकाळी पोलिस बंदोबस्तात सदर नाला व रस्ता मोकळा करून देण्यात आला. यावेळी मंडळ अधिकारी विकास वाघ,ग्राम महसूल अधिकारी सीमा राजळे,पोलिस पाटील सोनगिरे ,पोलिस कर्मचारी दत्तू लोखंडे,खंबाट उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments