वेरुळ मध्ये साकारणार मौनगिरी सृष्टी, कशी असेल ही सृष्टी याचे भाविक भक्तांसमोर सादरीकरण
खुलताबाद /प्रतिनिधी/ खुलताबाद-तालुक्यातील वेरुळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रमाच्या विस्तीर्ण परिसरातील ३० एकर जागेवर सुंदर संकल्पित भाविक व पर्यटकांसाठी आकर्षण ठरावे असे भव्य दिव्य मौनगिरी सृष्टी केंद्र उभारले जाणार असून,या संकल्पित सृष्टी केंद्राचे सादरीकरण रविवारी (दी. चार) जय बाबाजी भक्त परिवारासमोर करण्यात आले.
खुलताबाद
तालुक्यातील वेरुळ येथे संत जनार्दन स्वामी आश्रम असून,या आश्रम परिसरातील विस्तीर्ण जागेवर मौनगिरी सृष्टी केंद्र संकल्पित असुन,सध्या आश्रमात सुरु असलेल्या अक्षयतृतीये निमित्त उपस्थित जय बाबाजी भक्त परिवारा समोर करण्यात आलेल्या सादरीकरण वेळी राज्यसभा सदस्य डॉ.भागवत कराड, आमदार अनुराधा चव्हाण,स्वामी हितेंद्र आनंदगिरी महाराज, प. पु. महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज, समन्वयक राजेंद्र पवार यांची उपस्थिती होती. वेरुळ येथे होणारया या संकल्पित मौनगिरी सृष्टी केंद्रावर १८१ कोटी खर्च अपेक्षित असून,वेरुळला दरवर्षी भेट देणारया २० लाख भाविक,पर्यटकांसाठी एक भक्तीकेंद्र मनोरंजन केंद्र ठरणार आहे.
या मौनगिरी सृष्टी केंद्राची उभारणी करतांना सोलर पॅनलाचा वापर केला जाणार असून,या ठिकाणी ध्यानकेंद्र, लाईट अँड साउंड शो, मनोरंजनासाठी थीम पार्क,देशाची ऐतिहासिक पार्श्वभुमी विविध पुतळ्यांच्या माध्यमातून मांडली जाणार आहे,या मौनगिरी सृष्टी केंद्राचे वास्तुविशारद म्हणुन महेश साळुंके,तर शिल्प कलेचं काम खुलताबाद येथील प्रसिध्द कला शिल्पकार नरेंद्र साळुंखे हे काम पाहणार आहेत.
