खिर्डी ग्रामपंचायतीत ध्वजारोहण सोहळा संपन्न, शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव
खुलताबाद /प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील खिर्डी येथील ग्रामपंचायत गुरुवारी महाराष्ट्र दिनानिमित्त खिर्डी ग्रामपंचायतीत ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात संतोष जेठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी गावाचे सरपंच कृष्णा दवडे, माजी सरपंच कृष्णा चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य नवनाथ हिवर्डे, शंकर हिवर्डे,संदीप औटे तसेच गावातील अपंग बांधव आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे फेब्रुवारी महिन्यात घेतलेल्या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. खिर्डी येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता ५ वी मधील १५ विद्यार्थ्यांपैकी ८ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण केली. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत: आयेशा मिनाज बेग, तेजस्विनी गणेश मातकर, श्रावणी सुरेश दवंडे, आभा किशोर चव्हाण, श्रेयश गणेश हिवरडे, सायमा शरीफ पठाण, प्रथमेश शिवाजी मातकर आणि ईश्वरी दादासाहेब वरकड.
महाराष्ट्र दिनानिमित्त या विद्यार्थ्यांचा सरपंच कृष्णा दवंडे, नवनाथ हिवर्डे, कृष्णा चव्हाण, शेख चांद, संदीप औटे यांच्या हस्ते पुष्प देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होण्याबद्दल अभिनंदन करून त्यांचे मनोबल वाढवले.
