Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादपरीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासनाची सज्जता,जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासनाची सज्जता,जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासनाची सज्जता,जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

छत्रपती संभाजीनगर – नीट २०२५ची परीक्षा  रविवार दि.४ रोजी होत आहे. शहरातील ४९ केंद्रांवर १९ हजार ५०० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने सज्जता केली असून या पुर्व तयारीचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आढावा घेतला.

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा अर्थात National Eligibility Cu, Entrance Test (NEET) नीट २०२५ ही परीक्षा रविवार दि.४ रोजी दुपारी २ ते ५ या वेळात होत आहे. त्यासाठी परीक्षा केंद्रांवर करावयाची सज्जता, उपाययोजना याबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आढावा घेतला. उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य अनिल यादव, रविंद्र राणा, श्रीमती वैशाली जोशी तसेच सर्व परीक्षा केंद्रप्रमुख आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी सुचना दिल्या की, प्रत्येक परीक्षा केंद्र सीसीटीव्हीने जोडलेले असून प्रत्येक परीक्षार्थी प्रवेश करते वेळी त्याची तपासणी केली जाईल. कोणताही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस कुणीही सोबत बाळगणार नाही याची खातरजमा केली जाईल. दुपारची वेळ असल्याने विद्यार्थी यांना सावलीची व्यवस्था केली जाईल. प्रत्येक परीक्षार्थी विद्यार्थी हा किमान एक तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचेल अशा बेताने घरुन निघेल. बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचविण्यासाठी बसस्थानक व रेल्वेस्थानक येथे सिटी बसेस ठेवण्याचे  नियोजन सुरु असल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य विभाग यांच्या सहकार्यातून परीक्षा केंद्रावर एक मेडीकल टिम तैनात असेल. वाढत्या उन्हामुळे कुणालाही काही त्रास झाल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे, असेही त्यांनी सांगितले. परीक्षा पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Previous article
पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम जालना,दि.30 (जिमाका): राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. पालकमंत्री श्रीमती मुंडे यांचे बुधवार, दि. 30 एप्रिल, 2025 रोजी रात्री 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव. तसेच गुरुवार, दि. 1 मे, 2025 रोजी सकाळी 7.45 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथून वाहनाने पोलीस मुख्यालय, मैदानाकडे प्रयाण करतील. सकाळी 8.00 वाजता पोलीस मुख्यालय, मैदान येथे आगमन व महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम उपस्थित राहतील. तसेच सकाळी 8.30 वाजता जालना येथून वाहनाने परळी वैजनाथ, जि. बीडकडे प्रयाण करतील. तसेच पालकमंत्री श्रीमती मुंडे यांचे शनिवार, दि. 3 मे, 2025 रोजी दूपारी 2 वाजता जालना येथे आगमन होणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध शासकीय आढावा बैठकीस उपस्थित राहणार आहेत. सायं. 5.15 वाजता जालना येथून चिकलठाणा विमानतळ छत्रपती संभाजनगरकडे प्रयाण करतील.
Next article
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments