चितेगाव येथील रहिवासी बेपत्ता
बिडकीन: चितेगाव येथील रहिवासी १५ वर्षीय अल्फियान अफरोज शेख २६ तारखेपासून बेपत्ता आहे. त्याच्या कुटुंबाने शोध घेऊनही, अल्फियन कुठेही सापडला नाही. बेपत्ता व्यक्ती सापडत नसल्याने, बिडकीन पोलिस ठाण्यात कलम १३७(२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्फियान अफरोज शेखचा रंग गोरा आहे, डोळे काळे आहेत, चप्पल, काळी पँट आणि काळा शर्ट घालतो. अल्फियन मतिमंद आहे. बेपत्ता अल्पवयीन मुलगा कुठेही आढळल्यास बिडकीन पोलिस ठाण्यात बिडकीनचे एपीआय नीलेश शेळके ९९२२६६५००१, पीएसआय महेश घुगे ८९७५७६९१५० यांच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.
