नादरपुर येथील जिल्हा परिषद शाळेतील सातवीच्यां विद्यार्थ्यांना निरोप
कन्नड / प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील नादरपुर जि.प्र. प्राथमिक शाळा येथे इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश निकम
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. डी. टी. शिंदे सर शिक्षणविस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख, नाचनवेल उपस्थित होते. यांची विशेष उपस्थिती लाभली.यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष, सदस्य, सर्व शिक्षक,पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रामहारी निकम
यावेळी मुख्याध्यापक अशोक गाडेकर नरेंद्र पाटील जगन्नाथ कोंडके रामहारी निकम सुनिल जाधव स्मिता वाकळे ज्योती गंवाढे मनीषा जाधव व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कमिटी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तंटामुक्त अध्यक्ष गावातील ग्रामस्थ उपस्थित होते छायाचित्र सुनिल निकम