फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शिंदे गट युवा सेनेची बैठक संपन्न
फुलंब्री/प्रतिनिधी/ शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या विनंती नुसार व निलेश शिंदे महाराष्ट्र सचिव मराठवाडा विभाग यांच्या आदेशाने शिवसेना पक्षाच्या युवासेना फुलंब्री विधानसभा कार्यकारणी काल दिनांक २८ एप्रील रोजी करण्यात आली .
युवासेना मराठवाडा सचिव निलेश शिंदे युवासेना जिल्हा प्रमुख शिवाजी भगुरे, युवासेना जिल्हा समन्वयक भारत भुमे, तालुका प्रमुख प्रविण हातकगणे उपस्थित होते यावेळी अभिषेक तायडे यांची युवासेना तालुका समन्वयक , शुभम पवार यांची तालुका संघटक, योगेश चव्हाण यांची उपतालुकाप्रमुख गणोरी सर्कल, राम बोकील यांची उपतालुकाप्रमुख वडोद बाजार सर्कल, कुष्णा दांडेकर याची उपतालुकाप्रमुख पाल सर्कल, आकाश मोरे यांची उपतालुकाप्रमुख बाबरा सर्कल, अनिकेत जाधव याची विभाग प्रमुख गणोरी सर्कल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारियांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.